No Result
View All Result
सोलापूर : शहरातील वाचनसंस्कृतीला चालना देणारे आणि पुस्तकप्रेमींसाठी पर्वणी ठरणारे तब्बल दोन लाख पुस्तकांचे भव्य प्रदर्शन व विक्री डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सुरू झाली आहे. हुब हॉक्स प्रस्तुत ‘दरियागंज पुस्तके’ (गुरुग्राम, हरियाणा) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन रविवार, दि. १९ जुलैपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील विविध विषयांवरील लाखो पुस्तके एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
मराठी विभागात स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारताचे संविधान, छत्रपती शिवाजी महाराज, आरोग्य, आहार, औषधे, राजकीय, सामाजिक तसेच विविध साहित्यप्रकारांतील तीन हजारांहून अधिक पुस्तकांचा समावेश आहे.इंग्रजी साहित्यप्रेमींसाठी हॅरी पॉटर, डॅन ब्राऊन यांच्या पुस्तकांसह क्लासिक साहित्य, प्रेरणादायी पुस्तके, व्यवसाय, व्यक्तिमत्त्व विकास आणि बालसाहित्यातील हजारो पुस्तके उपलब्ध आहेत.
हिंदी विभागात रामकथा, गांधी का सैतालीस, महासम्राट शिवाजी घमासान, झूठा सच यांसारख्या लोकप्रिय पुस्तकांची मोठी श्रेणी विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे.प्रदर्शनात विविध वयोगटातील वाचकांसाठी परवडणाऱ्या दरात पुस्तकांची विक्री होत असून, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक, पालक आणि पुस्तकप्रेमींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक तरुण यादव यांनी केले आहे. शहर व परिसरातील नागरिकांकडून प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत असून, आगामी काही दिवसांत वाचकांची गर्दी आणखी वाढण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.
No Result
View All Result