Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

माऊलींच्या चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे ; “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे

Solapur Mirror by Solapur Mirror
July 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
माऊलींच्या चरणी मुख्यमंत्र्यांचे साकडे ; “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे

“राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे, शेतकरी सुखी राहू दे”; ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी रथाचे केले सारथ्य

पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दसूर पाटी येथे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेत राज्यातील सर्व जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. “राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी-समाधानी राहू दे,” असे साकडे त्यांनी माऊलींच्या चरणी घातले. यावेळी त्यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी रथाचे काही काळ सारथ्यही केले. वारीत सहभागी झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “वारीत चालणारा प्रत्येक वारकरी हा माऊलीचे जिवंत रूप आहे. या पवित्र सोहळ्यात सहभागी होणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माऊलींकडे माझी एकच प्रार्थना आहे की, राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडावा आणि शेतकरी समृद्ध व्हावा.”

ते पुढे म्हणाले की, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन वर्षांत वारी व्यवस्थापनात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी शासनाने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या वारीत विक्रमी संख्येने भाविक सहभागी होत असून, मागील वर्षांचे सर्व विक्रम मोडले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या नियोजनाचेही कौतुक केले. एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे भाविकांची संख्या मोजली जात असून, स्वच्छता, शौचालये, सफाई कर्मचारी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, जर्मन हँगर, चरणसेवा उपक्रम, आरोग्य पथके आणि इतर मूलभूत सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी वारी २०२६ च्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: आमदार देवेंद्र कोठेएकनाथ शिंदेजिल्हा परिषददेवेंद्र फडणवीसनगरसेवकराजकारणसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

सोलपूरच्या IT पार्कला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिंग्नल

Next Post

रेल डाक सेवा कार्यालयात आता ‘आधार’ची सर्व कामे एकाच छताखाली ; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
रेल डाक सेवा कार्यालयात आता ‘आधार’ची सर्व कामे एकाच छताखाली ; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर

रेल डाक सेवा कार्यालयात आता 'आधार'ची सर्व कामे एकाच छताखाली ; उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In