Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारातुनच समताधिष्ठीत समाज निमिर्ती शक्य- डॉ. गव्हाणे

Solapur Mirror by Solapur Mirror
June 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारातुनच समताधिष्ठीत समाज निमिर्ती शक्य- डॉ. गव्हाणे
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर विद्यापीठात शाहू महाराज जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन

सोलापूर- छत्रपती शाहू महाराज यांची कोल्हापूर संस्थानातील सर्वसामान्य व्यक्तीच्या जगण्याचा विचार करुण राज्य चालवले. त्यानुसार संस्था, कायदे आणि विकास केला. त्यामुळे शाहू महाराज यांच्या विचारातुनच समताधिष्ठीत समाज निमिर्ती शक्य आहे. असे प्रतिपादन लातूर येथील शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. महादेव गव्हाणे बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर उपस्थित होते.

व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, समन्वयक डॉ. गौतम कांबळे, प्र-कुलगुरु लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज आणि अहिल्यादेवी होळकर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्रात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनाचे उद्धघाटने प्रमुख पाहुणे डॉ. महादेव गव्हाणे, कुलगुरु प्रकाश महानवर, राजाभाऊ सरवदे, समन्वयक डॉ. गौतम कांबळे, प्र. कुलगुरु लक्ष्मीकांत दामा, प्र. कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी डॉ. महादेव गव्हाणे म्हणाले, शाहू महाराजांनी आपल्या विविध कृतीमधुन समता प्रस्तापीत करण्याचे कार्य केले आहे. तसेच आपल्या संस्थानात ५० टक्के आरक्षक लागु करणे, विधवा विवाह कायदा, प्राथमिक शिक्षक सक्तीचा कायदा, विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारणी, शेतकऱ्यासाठी राधानगरी धरण बांधणे या माध्यमातुन वास्तविक समता प्रस्तापीत केले आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतर आजही लोकशाही प्रस्तापीत झाली का असा प्रश्न उपस्थित करुण राजेशाहीतही लोकशाही रुजवण्याचे कार्य शाहू महाराज यांनी केल्याचे डॉ. गव्हाणे यांनी नमुद केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या सारखा लोककल्याणकारी राजा पुन्हा होणे नाही, असे सांगत आज विद्यार्थ्यांनी आणि समाजातील प्रत्येक घटकाने माणसाला माणुस म्हणुन काम केले तर शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समताधिष्ठत समाज निर्माण होईल असा आशावाद डॉ. गव्हाणे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर म्हणाले, शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहचवण्याचे कार्य शाहू महाराज यांनी केले. आज समाजाला शाहू महाराजांच्या विचारावर चालण्याची गरज निर्माण झाली असल्याचे कुलगुरु महानवर यांनी स्पष्ट केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण, मुकनायक वृत्तपत्र सुरु करण्यासाठी मदत केली. आणि माणगावच्या परिषदेत अस्पर्शानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना नेता म्हणून स्विकारावे, असे विविध पैलू सांगीतले. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. गौतम कांबळे यांनी केले.

प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी करून दिला.यावेळी कार्यक्रमाला वित्त व लेखा अधिकारी महादेव खराडे, परिक्षा व मुल्यामापन संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. चंद्रकांत गार्डी, आदीसह विद्यापीठातील विविध संकुलाचे संचालक, प्राध्यापक, कर्मवारी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्वीनी कांबळे यांनी केले तर आभार सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Previous Post

‘प्री वारी- पोस्ट वारी’ संकल्पनेची चर्चा; पंढरीतील स्थायी समिती बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Next Post

“धमकीच्या आरोपानंतर पत्रकार संघटना आक्रमक; कारवाईसाठी जोरदार आंदोलन”

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
“धमकीच्या आरोपानंतर पत्रकार संघटना आक्रमक; कारवाईसाठी जोरदार आंदोलन”

"धमकीच्या आरोपानंतर पत्रकार संघटना आक्रमक; कारवाईसाठी जोरदार आंदोलन"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025