Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वानकर यांच्या घरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक; २० लाखांचा मुद्देमाल जप्त

Solapur Mirror by Solapur Mirror
January 2, 2026
in क्राईम, सोलापूर शहर
0
वानकर यांच्या घरात घरफोडी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक; २० लाखांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
27
VIEWS
सोलापूर : शहर गुन्हे शाखेने एका मोठ्या आंतरराज्य घरफोडीचा छडा लावत तेलंगणातील एका सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी चोरीला गेलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण २० लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी सलगरवस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘राजमुद्रा रेसिडेन्सी’ (दामोदर निवास) येथे राहणारे प्रकाश दामोदर वानकर यांच्या घरात धाडसी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या घरातून तब्बल १३ लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. याप्रकरणी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेने मोईन मौलानासाब दुधेकुला (वय २९, रा. नरसापूर, जि. विकाराबाद, तेलंगणा) याला ताब्यात घेतले.

आरोपी मोईन हा अत्यंत सराईत असून त्याने आपली ओळख पटू नये म्हणून चोरी करताना विशेष खबरदारी घेतली होती: त्याने घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर (DVR) समजून चुकून इंटरनेट राऊटर चोरून नेला होता. हाताचे ठसे उमटू नयेत म्हणून त्याने हाताला रुमाल बांधून चोरी केली होती. चोरीच्या पैशातून तो गोव्याला जाऊन मौजमजा करण्याच्या तयारीत होता, मात्र त्याआधीच सोलापूर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी आरोपीकडून १३ लाख ५० हजार रुपये, ७ लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, २ हजार रुपये किमतीचा इंटरनेट राऊटर असा २० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, स.पो.नि. निलेश पाटील-सोनवणे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

सोलापूर महापालिका निवडणूक : १२३० अर्ज वैध; तब्बल २३० अर्ज अवैध

Next Post

मराठी साहित्य संमेलनाला गालबोट; संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला फासले काळे

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
मराठी साहित्य संमेलनाला गालबोट; संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला फासले काळे

मराठी साहित्य संमेलनाला गालबोट; संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या तोंडाला फासले काळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In