Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लाडक्या बहि‍णींच्या ई-केवायसीला ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..!

Solapur Mirror by Solapur Mirror
November 18, 2025
in सोलापूर जिल्हा
0
लाडक्या बहि‍णींच्या ई-केवायसीला ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ..!
0
SHARES
9
VIEWS

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. लाभार्थींना आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करता येणार आहे. म्हणजेच या प्रक्रियेसाठी अधिकचे ४३ दिवस मिळाले आहेत. ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्यांच्यासाठीही नियमावली स्पष्ट करण्यात आली आहे.

संबंधित महिलांनी स्वतःचे ई-केवायसी स्वत: करावे, आणि त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला आणि बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी, असे महिला आणि बाल विकास विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक अपात्र महिला आणि पुरुषांनीही घेतल्याने निदर्शनास आले होते. अपात्रांना सेवेतून वगळून सरकारी निधीची बचत करण्यासाठी लाभार्थींची ई-केवायसी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी १८ सप्टेंबरपासून विशेष मोहिमेला सुरुवात केली होती. ई-केवायसी करण्याची मुदत १८ नोव्हेंबरपर्यंतच होती. परंतु ही प्रक्रिया करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत वाढवणार की नाही, याकडे लाखो महिलांचे लक्ष लागून होते. परंतु लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे.

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी याविषयी ‘एक्स’वर पोस्ट करत ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे जाहीर केले. मंत्री तटकरे म्हणाल्या, ‘ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे. त्या लाभार्थी महिलांनी स्वतः ई-केवायसी करावे आणि त्यांचे पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे.’

Previous Post

संसर्गजन्य आजारांचा धोका टाळण्यासाठी दररोज बदलणार रुग्णांचे बेडशीट

Next Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका धोक्यात; OBC च्या 50% आरक्षण मर्यादेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका धोक्यात; OBC च्या 50% आरक्षण मर्यादेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका धोक्यात; OBC च्या 50% आरक्षण मर्यादेवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In