No Result
View All Result
सोलापूर, : वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर यांच्यावर महापालिका सेवा नियमांनुसार अद्याप शिस्तभंगाची कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धतीनुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही त्वरित करावी, अशी मागणी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे. महापालिका कामगार संघटना संघर्ष समितीने ११ जून २०२६ रोजी आयुक्त डॉ. ओम्बासे यांना निवेदन देऊन आरोग्य विभागातील तत्कालीन सीटीओ डॉ. हराळकर यांच्याकडून कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास व दमदाटी दिल्याची तक्रार केली होती.
त्यानंतर प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली. चौकशीदरम्यान संबंधित २३ कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविण्यात आले असून, अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. दरम्यान, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी या प्रकरणाची दखल घेत आयुक्तांना पत्र दिले आहे. प्राप्त चौकशी अहवालाची नियमानुसार तपासणी करून महापालिका सेवा नियम व प्रचलित प्रशासकीय कार्यपद्धतीनुसार आवश्यक ती पुढील कार्यवाही त्वरित करावी, जेणेकरून कामगार व कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे योग्य निराकरण होऊन प्रशासनात सकारात्मक वातावरण निर्माण होईल, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
No Result
View All Result