Friday, April 17, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

झेडपीत ‘अक्कलकोट पॅटर्न’ची चर्चा; दोन सदस्यांच्या बंडानंतर विषय समित्या अखेर बिनविरोध

राजेश भोई by राजेश भोई
April 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
झेडपीत ‘अक्कलकोट पॅटर्न’ची चर्चा; दोन सदस्यांच्या बंडानंतर विषय समित्या अखेर बिनविरोध
0
SHARES
203
VIEWS

सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडीत मंगळवारी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. अक्कलकोट तालुक्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) दोन सदस्यांनी अनपेक्षितपणे बंडाचे निशाण फडकवल्याने बिनविरोध प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आणि पालकमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करत ‘डॅमेज कंट्रोल’ केल्याने अखेर ८३ सदस्यांची निवड बिनविरोध झाली. यामध्ये शिवराज म्हेत्रे यांची शिक्षण, तर पंडित तानवडे यांची अर्थ समितीवर वर्णी लागली आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य आणि उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या उपस्थितीत विशेष सभा बोलावण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना सोबत घेऊन याद्या तयार होत्या. मात्र, या यादीत अक्कलकोटचे सदस्य शिवराज म्हेत्रे आणि पंडित तानवडे यांचे नाव नसल्याचे स्पष्ट होताच त्यांनी थेट समाजकल्याण, शिक्षण आणि बांधकाम समितीसाठी स्वतंत्र अर्ज भरले. यामुळे एकीकडे अध्यक्ष-उपाध्यक्ष बिनविरोध निवडून आलेले असताना, सदस्यांसाठी मात्र मतदानाची वेळ येते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती.

बंडखोरीमुळे पेच निर्माण होताच भाजपच्या गोटात हालचाली वेगवान झाल्या. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आणि आमदारांची तातडीने हॉटेल बालाजी सरोवर येथे बैठक झाली. उपाध्यक्ष इंद्रजीत पवार आणि पक्षनेत्या रश्मी बागल यांनी ही बाब गंभीरपणे घेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी संपर्क साधला. अखेर पालकमंत्र्यांनी दोन्ही नाराज सदस्यांना समित्यांमध्ये सामावून घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर म्हेत्रे आणि तानवडे यांनी माघार घेतली.

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, जर ही निवडणूक झाली असती, तर दोन्ही बंडखोर सदस्यांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांचा पराभव निश्चित होता. मात्र, यामुळे महायुतीची बदनामी झाली असती आणि प्रशासनावर विनाकारण ताण पडला असता. ही नामुष्की टाळण्यासाठी भाजपने लवचिक भूमिका घेत मित्रपक्षाच्या सदस्यांना न्याय देणे पसंत केले.

दुपारी साडेतीन वाजता सभा सचिव स्मिता पाटील यांनी सर्व ८३ सदस्य बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा केली. यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनाही संधी देऊन भाजपने सर्वसमावेशकता जपण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील राजकीय तणाव निवळला असून नव्या समित्या आता कामकाजासाठी सज्ज झाल्या आहेत.

Previous Post

गणेश नगर तांडा, कोंडी येथे घनश्याम भोसले प्रतिष्ठानतर्फे साड्या वाटप

Next Post

प्राण्यांवर प्रेम करणे ही बसवेश्वरांची शिकवण : वीरशैव व्हिजनतर्फे जलकुंभांचे वाटप

Related Posts

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार : सोलापूर जि.प.चे नूतन CEO कुशल जैन​
सोलापूर जिल्हा

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार : सोलापूर जि.प.चे नूतन CEO कुशल जैन​

April 16, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली
सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली

April 15, 2026
नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व
सोलापूर जिल्हा

नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

April 15, 2026
सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही; पारा ४३.३ अंशांवर, रात्रीही उकाडा कायम
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही; पारा ४३.३ अंशांवर, रात्रीही उकाडा कायम

April 15, 2026
सोलापूर विद्यापीठात 18 तासांचे अखंड वाचन ; डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचा उपक्रम
सोलापूर जिल्हा

सोलापूर विद्यापीठात 18 तासांचे अखंड वाचन ; डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचा उपक्रम

April 15, 2026
लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे
सोलापूर जिल्हा

लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे

April 15, 2026
Next Post
प्राण्यांवर प्रेम करणे ही बसवेश्वरांची शिकवण : वीरशैव व्हिजनतर्फे जलकुंभांचे वाटप

प्राण्यांवर प्रेम करणे ही बसवेश्वरांची शिकवण : वीरशैव व्हिजनतर्फे जलकुंभांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार : सोलापूर जि.प.चे नूतन CEO कुशल जैन​

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार : सोलापूर जि.प.चे नूतन CEO कुशल जैन​

April 16, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली

सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली

April 15, 2026
नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

April 15, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025