Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाची पुन्हा हाक; २० ऑक्टोबर २०२३ च्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा..

Solapur Mirror by Solapur Mirror
June 16, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जात वैधता प्रमाणपत्रासाठी कोळी समाजाची पुन्हा हाक; २० ऑक्टोबर २०२३ च्या निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करा..

सोलपूर : महाराष्ट्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील कोळी समाजाच्या जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नावर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी कोळी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने त्वरित परिपत्रक काढावे, यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

स्मरणपत्रात नमूद करण्यात आले आहे की, अनुसूचित जमातीतील कोळी समाजाच्या बांधवांना जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः एकाच कुटुंबातील किंवा रक्त नात्यातील व्यक्तींकडे वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही इतर सदस्यांना नव्याने कागदपत्रांची पूर्तता करावी लागत असल्याने प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आणि वेळखाऊ ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २० ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या बैठकीत अनुसूचित जमातीतील नागरिकांना जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याबाबत, तसेच रक्त नात्यातील समाजबांधवांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सोपी करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती. संबंधित निर्णयांची अंमलबजावणी होणे अपेक्षित असताना विधानसभा, महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे परिपत्रक जारी होण्यास विलंब झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

परिपत्रकाच्या विलंबामुळे राज्यभरातील कोळी समाजामध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, विद्यार्थी, नोकरीसाठी अर्ज करणारे युवक-युवती आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांना त्याचा फटका बसत असल्याचे कोळी महासंघाने म्हटले आहे. कोळी महासंघाने शासनाला दिलेल्या स्मरणपत्रात, २० ऑक्टोबर २०२३ च्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार तातडीने परिपत्रक जारी करून निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने या विषयात विशेष लक्ष घालून संबंधित विभागांना त्वरित निर्देश द्यावेत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

यावेळी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, शहराध्यक्ष आप्पासाहेब हिप्परगे, जिल्हा कार्याध्यक्ष शंभू माने, विक्रम शिरसाट विश्वनाथ पॅटी आधी कोळी महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post

तांदुळवाडी दुर्घटनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी; एमएस आरडीसीला तात्काळ कारवाईचे निर्देश

Next Post

रक्ताच्या प्रत्येक थेंबातून वाचते जीवन; सोलापुरात जनजागृती मोहीम

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
रक्ताच्या प्रत्येक थेंबातून वाचते जीवन; सोलापुरात जनजागृती मोहीम

रक्ताच्या प्रत्येक थेंबातून वाचते जीवन; सोलापुरात जनजागृती मोहीम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In