Friday, June 5, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 15, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
लवकर निदान, योग्य उपचार हाच मंत्र; समाजासाठी समर्पित आरोग्य उपक्रम – डॉ. सूर्यप्रकाश कोठे
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकीचा आदर्श जपत श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र, सोलापूर यांच्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाच्या वतीने पोट, आतडे, लिव्हर व पचनसंस्थेशी संबंधित आजारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे प्रभावी आयोजन करण्यात आले मार्कंडेय रुग्णालयातील ओपीडी हॉल येथे पार पडलेल्या या शिबिराचे उद्घाटन महापौर विनायक कोंडयाल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली, चेअरमन डॉ. माणिक गुर्रम, संचालक डॉ. विजयकुमार आरकाल, अशोक आडम, लक्ष्मीनारायण कुचन, रायेशम येमुल, मनोहर अन्नलदास, पार्वतय्या श्रीराम, कमटम सर, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, किसन श्रीराम, डॉ. श्रीकांत माकम, डॉ. अभिजीत चिंचोली आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच श्री मार्कंडेय महामुनी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली या संपूर्ण शिबिराचे प्रमुख संयोजन गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ञ डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांनी पुढाकार घेऊन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय टीमने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने नागरिकांची तपासणी करून दर्जेदार आरोग्य सेवा पुरवली. त्यांच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी मनोगतातून विशेष कौतुक केले. प्रास्ताविकात डॉ. कोठे यांनी सांगितले की, यकृत व पचनसंस्थेचे आजार सुरुवातीच्या टप्प्यात ओळखले गेले तर गंभीर गुंतागुंत टाळता येते. त्यामुळे वेळेवर निदान आणि जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे. या शिबिरामध्ये एंडोस्कोपी तपासणीवर ५०% सवलत देण्यात आली, तसेच फायब्रोस्कॅन, रक्त तपासणी आणि पोट, आतडे व लिव्हरशी संबंधित आजारांची मोफत तपासणी करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात आलेल्या या तपासण्यांमुळे अनेक रुग्णांना त्यांच्या आजारांचे प्रारंभिक निदान होण्यास मदत झाली.

महापौर विनायक कोंडयाल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, मोफत आरोग्य शिबिर ही आजच्या काळाची गरज असून अशा उपक्रमांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरते. तसेच, रुग्णालयाचे प्रेसिडेंट सत्यनारायण बोल्ली यांनी भविष्यात सर्व विभागांच्या माध्यमातून अशा मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला.

या शिबिरात डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या वतीनं हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी आणि फायब्रोस्कॅन या तपासण्या मोफत करण्यात आल्या.यांच्याकडून एकूणच, आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे मोफत गॅस्ट्रो शिबिर केवळ उपचारापुरते मर्यादित न राहता प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा या संकल्पनेला बळकटी देणारे ठरले. डॉ. सूर्यप्रकाश कोठे आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या पुढाकारामुळे सोलापूरमध्ये आरोग्यसेवेचा एक प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

Previous Post

प्राण्यांवर प्रेम करणे ही बसवेश्वरांची शिकवण : वीरशैव व्हिजनतर्फे जलकुंभांचे वाटप

Next Post

सोलापूर विद्यापीठात 18 तासांचे अखंड वाचन ; डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचा उपक्रम

Related Posts

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

June 5, 2026
हत्तूर बायपासजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू
सोलापूर जिल्हा

हत्तूर बायपासजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026
पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली
सोलापूर जिल्हा

पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली

June 5, 2026
प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..
सोलापूर जिल्हा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज
सोलापूर जिल्हा

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
Next Post
सोलापूर विद्यापीठात 18 तासांचे अखंड वाचन ; डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचा उपक्रम

सोलापूर विद्यापीठात 18 तासांचे अखंड वाचन ; डॉ. आंबेडकर अध्यासन केंद्राचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

June 5, 2026
हत्तूर बायपासजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

हत्तूर बायपासजवळ भीषण अपघात; पिकअपच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

June 5, 2026
पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली

पर्यावरण दिनी अवैध तोड झालेल्या ११८ झाडांना श्रद्धांजली

June 5, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025