Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट

Solapur Mirror by Solapur Mirror
May 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट
0
SHARES
29
VIEWS

सोलापुरात सायबर फसवणुकीचा नवा फंडा; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सोलापूर ; सोलापूर जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच आता थेट जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची ओळख वापरून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

सायबर गुन्हेगारांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांचा फोटो आणि नाव वापरून 84858276088 या क्रमांकावरून फेक व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार केले आहे. या माध्यमातून नागरिकांची फसवणूक, आर्थिक व्यवहार किंवा संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकाराची माहिती स्वतः जिल्हाधिकारी एस. कार्तिकेन यांनी त्यांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसद्वारे सार्वजनिक केली. संबंधित क्रमांकावरून येणारे संदेश, कॉल किंवा आर्थिक मागण्यांकडे दुर्लक्ष करावे, कोणतीही वैयक्तिक अथवा बँकविषयक माहिती शेअर करू नये तसेच संबंधित नंबर तात्काळ ब्लॉक करावा, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नावानेही अशाच प्रकारे बनावट व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट तयार करण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाचाही गैरवापर झाल्याने सायबर गुन्हेगार थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच लक्ष्य करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. डिजिटल माध्यमांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्हेगारांकडून अधिकाऱ्यांचे फोटो, नाव आणि पदाचा वापर करून विश्वास निर्माण केला जात आहे. त्यानंतर पैशांची मागणी, ओटीपी, बँक तपशील किंवा इतर संवेदनशील माहिती मिळवण्याचे प्रयत्न होत असल्याचे समोर येत आहे.

दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, अधिकृत खात्री केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करू नयेत आणि संशयास्पद प्रकार तात्काळ सायबर पोलिसांच्या निदर्शनास आणावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

बार्शीतील ‘लवंगी मिरची’ कला केंद्रावर मध्यरात्री पोलिसांची धाड ;

Next Post

सोलापुरात ‘मोशन फेस्ट २०२६’ची रंगत; फिटनेस आणि फिजिओथेरपी क्षेत्रातील भव्य महोत्सव ३१ मे रोजी

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापुरात ‘मोशन फेस्ट २०२६’ची रंगत; फिटनेस आणि फिजिओथेरपी क्षेत्रातील भव्य महोत्सव ३१ मे रोजी

सोलापुरात ‘मोशन फेस्ट २०२६’ची रंगत; फिटनेस आणि फिजिओथेरपी क्षेत्रातील भव्य महोत्सव ३१ मे रोजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025