सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नावाने फेक व्हाट्सअॅप प्रोफाईल तयार करुन अनेकांना मेसेज पाठविण्यात येत आहे. तो नंबर व्हिएतनाम येथील आहे. त्यामुळे तो ब्लॉक करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे सीईओ जैन यांनी केले. चुकीचा व्हॉट्सअॅप प्रोफाईल तयार करुन मेसेज पाठविण्यात असल्याची माहिती सीईओ जैन मिळाताच त्यांनी तातडीने सायबर क्राईमकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्या नंबरची चौकशी केली असता व्हिएतनाम येथील नंबर असल्याचे दाखविण्यात येत आहे. दरम्यान, ८४५६७७६६९७० या बोसग नंबरच्या सहाय्याने सीईओ जैन यांचा व्हाट्सअॅप तयार करुन सीईओ जैन यांचा प्रोफाईलला फोटो ठेवण्यात आला आहे. तसेच त्या व्हाट्सअॅपद्वारे अनेकांना मेसेज केला जात आहे. तो फेक नंबर असून, त्याला कोणीही उत्तर देवू नये. तसेच त्यानंबर वरून मेसेज आल्यास नंबर ब्लॉक करण्याचे आवाहन सीईओ जैन यांनी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना केले आहे.


हॅकरकडून आयएस अधिकारी टारगेट
गेल्या काही महिन्यांपासून आयएस अधिकाऱ्यांचे मोबाईल हॅक करुन विविध जणांनाकडून पैसे मागण्याच्या घटनेत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यापुढे कोणत्याही आयएस अधिकाऱ्यांनी ऑनलाईन पैसे मागितल्यास पैसे देण्याचे टाळावे, अशी भावना अधिकाऱ्यांतून पुढे येत आहे.











