सोलापूर : भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव येथे सॉफ्टवेंजर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व २० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता फुल कॅम्पस इंटरव्ह्यू ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे. २०२५ व २०२६ मध्ये पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी सिव्हिल आणि बायो मेडिकल इंजिनिअरिंग वगळता सर्व अभियांत्रिकी शाखांतील विद्यार्थी तसेच बीसीए, एमसीए आणि बीएससी कम्प्युटर/आयटी शाखेतील विद्यार्थी पात्र राहणार आहेत. उमेदवारांना कोणताही बॅकलॉग किंवा इयर डाऊन नसणे आवश्यक असल्याचे महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे. भरती प्रक्रियेपूर्वी १८ मे रोजी ऑनलाईन ओरिएंटेशन कार्यक्रम घेण्यात येणार असून, त्यामध्ये विद्यार्थ्यांना कंपनीची माहिती आणि निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. निवड प्रक्रियेत एटीट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन आणि एचआर मुलाखतीचा समावेश असणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमाने यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना दर्जेदार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाविद्यालय सातत्याने प्रयत्नशील आहे. अशा फुल कॅम्पस ड्राईव्हमुळे विद्यार्थ्यांना नामांकित कंपनीत करिअर घडवण्याची मोठी संधी मिळणार आहे.” महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत विविध महाविद्यालयांतील पात्र विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












