Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

Solapur Mirror by Solapur Mirror
April 13, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!
0
SHARES
93
VIEWS

सोलापूर:जिल्हयातील सहकार आणि खाजगी साखर कारखानदारीमध्ये मोठे नाव असलेल्या लोकमंगल समूहाच्या भंडारकवठे (ता. दक्षिण सोलापूर) येथील साखर कारखान्याने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऊस गाळप होऊन तब्बल सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी, अद्याप शेतकऱ्यांच्या घामाचे दाम त्यांच्या पदरात पडलेले नाहीत. ‘जानेवारी महिन्यात बिले जमा करू’ असे आश्वासन देणाऱ्या प्रशासनाने आता मार्च महिना उजाडला तरी टाळाटाळ सुरू केल्याने बळीराजा संतापला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भंडारकवठे येथील लोकमंगल युनिटला ज्या शेतकऱ्यांनी आपला ऊस गाळपासाठी दिला होता, त्यांना नियमानुसार १४ दिवसांच्या आत बिले मिळणे अपेक्षित होते. मात्र, कारखान्याने आर्थिक अडचणींचे कारण पुढे करत वेळकाढूपणा केला. शेतकऱ्यांनी जेव्हा जानेवारी महिन्यात विचारणा केली, तेव्हा कारखाना प्रशासनाने लेखी आणि तोंडी स्वरूपात खात्री दिली होती की, “जानेवारी अखेरपर्यंत सर्व थकीत बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील.” मात्र, फेब्रुवारी उलटून आता मार्च महिना अर्धा संपत आला तरी शेतकऱ्यांचे खाते अद्याप ‘कोरेच’ आहे.

हवालदिल झालेले शेतकरी जेव्हा कारखान्याच्या ऊस बिल विभागात किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशीसाठी जात आहेत, तेव्हा त्यांना सन्मानजनक वागणूक मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. “वरच्या स्तरावरून अद्याप फंड आला नाही” किंवा “लवकरच व्यवस्था होईल” अशी ठराविक उत्तरे देऊन शेतकऱ्यांना माघारी धाडले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, कारखान्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

आज शेतकरी हा चौफेर संकटात सापडला आहे. एकीकडे नैसर्गिक आपत्ती आणि दुसरीकडे वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने, बँकेचे हप्ते आणि पुढील हंगामासाठी लागणारी खते-बियाणे यासाठी शेतकरी ऊस बिलावर अवलंबून असतो. लोकमंगल कारखान्याने बिले थकवल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे बँकांचे हप्ते थकले असून त्यांना व्याजाचा भुर्दंड सोसावा लागत आहे.

लोकमंगल कारखान्याच्या या मनमानी कारभाराविरोधात आता शेतकरी संघटना आक्रमक होण्याची शक्यता आहे. जर येत्या काही दिवसांत थकीत बिले मिळाली नाहीत, तर कारखान्यावर धडक मोर्चा काढण्याचा आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. ‘शेतकऱ्यांचा कैवारी’ म्हणवून घेणाऱ्या नेत्यांच्या कारखान्यातच जर शेतकऱ्यांची अशी पिळवणूक होत असेल, तर दाद मागायची कोणाकडे, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

आता या प्रकरणात साखर आयुक्त आणि जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार आणि शेतकऱ्यांना त्यांचा हक्क कधी मिळणार, याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.”आम्ही विश्वासाने कारखाना चालवायला ऊस दिला, पण आज आमच्याच पैशासाठी आम्हाला भिकाऱ्यासारखे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मार्च महिना संपत आला तरी पैसे मिळत नसतील तर आम्ही जगायचे कसे?”
भीमाशंकर तुळाराम भोई (सादेपूर. द. सोलापूर शेतकरी)

Previous Post

१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

Next Post

सोलापूरच्या विकासाला मिळणार ‘सुपर फास्ट’ गती; आमदार देवेंद्र कोठे घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट..

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूरच्या विकासाला मिळणार ‘सुपर फास्ट’ गती; आमदार देवेंद्र कोठे घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट..

सोलापूरच्या विकासाला मिळणार 'सुपर फास्ट' गती; आमदार देवेंद्र कोठे घेतली जिल्हा अधिकाऱ्यांची भेट..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In