Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शेतीसाठी पाच तास वीजपुरवठा; तीन दिवसांत डीपी देण्याचे नियोजन : पालकमंत्री गोरे

Solapur Mirror by Solapur Mirror
July 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शेतीसाठी पाच तास वीजपुरवठा; तीन दिवसांत डीपी देण्याचे नियोजन : पालकमंत्री गोरे
0
SHARES
58
VIEWS

सोलापूर ; अलनिनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात अद्यापही पाऊस पडला नाही. जिल्ह्यातील पाणी जपून वापरले पाहिजे. शेतीसोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. विजेची अडचण माहिती असल्याचे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शेतकऱ्यांना आजपासून २ ऐवजी ५ तास वीज मिळणार असल्याचे सांगितले. डीपी जळाल्यास तीन दिवसांत दुसरा डीपी देण्याचे नियोजन केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार सुभाष देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार अभिजित पाटील, खासदार प्रणिती शिंदे यांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आठ तास वीज देण्याची आग्रही मागणी केली. करमाळ्याचे आमदार नारायण पाटील म्हणाले, उजनी काठावर इंदापूर तालुक्यात आठ तास तर करमाळा तालुक्यात फक्त दोन तास वीज दिली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर हा अन्याय आहे, आम्हालाही आठ तास वीज द्या, तशीच व्यथा आमदार सुभाष देशमुख यांनी मांडली. कर्नाटकात भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आठ तास वीज मिळते, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र दोन तासच वीज मिळते, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर हा अन्याय असल्याचे त्यांनी सांगितले.

उजनीत कृष्णेचे पाणी अन् गाळ उजनीतील गाळ व वाळूचा उपसा व्हावा, कृष्णेचे पाणी उजनी धरणात यावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्याची विनंती आमदार राजेंद्र राऊत यांनी पालकमंत्री गोरे यांच्याकडे केली. वाळू उपशासाठी न्यायालयातील विषय मार्गी लागले, इतर विभागाची मंजुरीही मिळाली आहे, लवकरच ही प्रक्रिया होईल. कृष्णेचे पाणी उजनीद्वारे मराठवाड्याला देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पासाठी निधी उभारला जात आहे, लवकरच मुख्य कामाची निविदाही काढली जाईल, अशी माहिती पालकमंत्री गोरे यांनी दिली.

नीरा, टेंभू, भाटघरच्या पाण्याची मागणी माळशिरस, पंढरपूर, सांगोला आणि मंगळवेढा या तालुक्यांना टेंभू, निरा भाटघर व वीर धरणातून पाणी सोडावे, अशी मागणी आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार उत्तम जानकर व आमदार अभिजित पाटील यांनी केली. दोन दिवसांत उडतो डीपी शेतकऱ्यांना मिळालेला डीपी २ दिवसांत उडतो, त्यानंतर १५-१५ दिवस डीपी मिळत नसल्याचा मुद्दा मोहोळचे आमदार राजू खरे यांनी उपस्थित केला. डीपी खराब आहेत की, डीपीसाठी वापरले जाणारे ऑईल खराब आहे?, हे माहिती नाही परंतु ग्रामीण भागात विजेचा प्रश्‍न गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले

Previous Post

ति-हे येथे संत गजानन महाराज पालखी सोहळ्याची जय्यत तयारी…

Next Post

खासदार ज्योती वाघमारे यांची उपस्थिती ; ‘हरित सोलापूर’साठी ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
खासदार ज्योती वाघमारे यांची उपस्थिती ; ‘हरित सोलापूर’साठी ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

खासदार ज्योती वाघमारे यांची उपस्थिती ; ‘हरित सोलापूर’साठी ५०० वृक्ष लागवडीचा संकल्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025