Thursday, June 4, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

भगव्या झेंड्याचा थोर उपासक ते सुजाण लोकनेता: शिवशरण ‘आण्णा’ बिराजदार पाटील यांचा जीवनप्रवास!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
June 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
भगव्या झेंड्याचा थोर उपासक ते सुजाण लोकनेता: शिवशरण ‘आण्णा’ बिराजदार पाटील यांचा जीवनप्रवास!
0
SHARES
26
VIEWS

सोलापूर :.जन सामान्यातील कष्टप्रद दिवसांची जाणीव ठेवून गरिबांशी जवळचे नाते जपणारे, सर्वसामान्यांना सोबत घेऊन जाणारे ‘आण्णा’ खऱ्या अर्थाने लौकिकास पात्र ठरलेले माजी आमदार शिवशरण ‘आण्णा’ बिराजदार पाटील यांचा आज 65 वा वाढदिवस. वास्तविक सोलापूरकरांच्या सदोदित सान्निध्यात असणारे, कायम हसतमुख, सदाचार व शिष्टाचार यांचा सुरेख संगम, समयसूचकता व धाडस यांचे उत्तम संयोजन, आणि कर्तृत्व व सांघिक नेतृत्वाचा अनोखा संगम म्हणजे ‘आण्णा’!त्याग, सेवा, परायणता, निर्णयक्षमता, उत्कृष्ट प्रशासकीय कौशल्य, अन्यायाची चीड असणारा धाडसी शिवसैनिक आणि भगव्या झेंड्याचा थोर उपासक है आण्णांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू.

एकाच व्यक्तीमध्ये एवढे सारे गुण पाहून लक्षात येते की, विश्वकर्त्या परमेश्वराने आपले सर्व कसब पणाला लावून ‘आण्णा’ या महान समाजसेवकाची निर्मिती केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तमाम कार्यकर्त्यांना आण्णांविषयी वेगळेच आकर्षण वाटते.तसे पाहता, आण्णांचे बालपण त्यांच्या मूळगावी मैंदर्गी येथे गेले. पण लहानपणापासूनच समाजकार्याची आवड असणारे आण्णा, त्यांचे काका मैंदर्गीरत्न, उद्योगपती कै. ए. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात आले. गोरगरीब विद्यार्थ्यांनी शिकावं मोठं व्हावं यासाठी अण्णांनी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेमध्ये गणेश नाईक बालक व विद्या मंदिर व कै. मातोश्री मलकव्वा हनुमंतप्पा बिराजदार पाटील प्रशालेच्या मार्फत हजारो गोरगरीब विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोचवण्याचं काम आजही अविरत होत आहे.

सन 1985 मध्ये, वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी, त्यांनी शिवसेना या सेवाभावी संघटनेत केवळ समाजसेवेसाठी स्वतःला झोकून दिले, प्रथमतः शाखाप्रमुख, नंतर गटप्रमुख, शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख अशी नेतेपदाची वाटचाल करत, फेब्रुवारी 1997 मध्ये झालेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आण्णांनी पहिल्यांदाच नगरपालिकेत विजयी निशाण फडकावले.तेव्हापासूनच आण्णांची एक आक्रमक लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण झाली. आपल्या बेधडक आक्रमक शैलीच्या जोरावर आण्णांनी इंद्रभवनात शिवसेनेला स्वतंत्र बैठकव्यवस्था मिळवून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांना भाग पाडले.

त्यामुळे त्यांना पहिल्यांदाच स्थायी समिती सदस्य आणि शिवसेना महापालिका पक्षनेते पद बहाल करण्यात आले. एका वर्षाच्या कारकीर्दीत आण्णांनी शहरवासीयांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली. याची दखल घेत 1999 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.या निवडणुकीत आण्णांनी बाजी मारली. तेव्हापासून, शहर दक्षिण सोलापूरमधील सुजाण मतदारांचे प्रतिनिधित्व ‘त्यागाचे प्रतीक असलेल्या भगव्या झेंड्या खाली विधानभवनात करण्यास त्यांनी सुरुवात केली. आमदार झाल्यानंतर आण्णांनी आपल्या संपर्काच्या शाखा व दिशा विस्तारित करत, प्रत्येक अधिवेशनात आक्रमकतेचे दर्शन घडवून सत्ताधाऱ्यांना झुलवत ठेवले. आपल्या सर्व समाजबांधवांना शिवसैनिक म्हणून संघटित करून, विद्यमान शासकाला समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडले.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेखाली, ‘80% समाजकारण आणि 20% राजकारण’ या तत्वावर काम करत आण्णांनी प्रत्येक कार्यात यश संपादन केले. सोलापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा पूर्ण कायापालट करणे हे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांच्या धडपडीची आणि प्रचंड ऊर्जेची साक्ष देणारे अनेक क्षण आहेत. सकाळी सात ते रात्री बारापर्यंत, कधी कधी एकपर्यंत देखील न यकता जनहिताची कामे करणारा, प्रत्येक बाबतीत सविस्तर विचार करणारा, प्रत्येक कार्यकर्त्याच्या अडचणी ऐकून घेणारा आणि त्या तत्परतेने सोडवणारा असा लोकनेता दुर्मिळच असतो.आजही कोणत्याही प्रकारचे पद नसतानाही जनसामान्यांची प्रचंड गर्दी ‘शिवरथ निवास’ या आण्णांच्या निवासस्थानी पाहायला मिळते.

आणि त्याच उमेदीने आण्णा प्रत्येक कार्यकर्त्याची अडचण तितक्याच तत्परतेने सोडवतात. मधल्या काळात एका दुर्धर आजाराने आण्णांना जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण असले किरकोळ आजार शिवसेनेच्या वाघाला काय यांबवणार? ते म्हणतातच नाः ‘धडाडी त्याच्या रक्तात, झळाळणारे तेज त्याच्या शब्दात शिवसेनेचा आमदार हाच महाराष्ट्राचा खरा सरदार. जनतेच्या आशा-आकांक्षा त्याच्या मनगटावरचा भार, सत्तेत असो वा नसतो, माणुसकीचाच खरा व्यवहार !’अशा या सच्च्या माणसाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.. ;मदन पोलके सहशिक्षक

Tags: माजी आमदारशिवशरण पाटील
Previous Post

32 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर संजय कांबळे यांचा रेल्वे सेवेतून निवृत्तीनिमित्त सत्कार

Next Post

भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून भीषण धडक; अरणच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Related Posts

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..
सोलापूर जिल्हा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज
सोलापूर जिल्हा

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली
सोलापूर जिल्हा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

June 2, 2026
१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग
सोलापूर जिल्हा

१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

June 2, 2026
आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
सोलापूर जिल्हा

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

June 2, 2026
Next Post
भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून भीषण धडक; अरणच्या तरुणाचा जागीच मृत्यू

भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून भीषण धडक; अरणच्या तरुणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025