Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ब्रेकिंग : टीईटी चा पेपर फुटला ; मेडिकल विभाग पटोपाट शिक्षण विभाग ही रडारवर

Solapur Mirror by Solapur Mirror
June 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ब्रेकिंग : टीईटी चा पेपर फुटला ; मेडिकल विभाग पटोपाट शिक्षण विभाग ही रडारवर

सोलापूर : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे.

ठाण्यात पोलिसांचा सापळा, प्रश्नपत्रिका जप्त मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या आदल्या दिवशीच काही जण पैसे घेऊन प्रश्नपत्रिका वाटत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईदरम्यान प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्याचा दावा केला जात असून, काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेची माहिती तातडीने शिक्षण विभागाला देण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

शिक्षण विभागाकडून अधिकृत आदेशाची प्रतीक्षा : सध्या शिक्षण विभागाकडून अधिकृत परिपत्रक जारी होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र पेपरफुटीची माहिती प्राथमिक स्तरावर निश्चित झाल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नवीन परीक्षा कधी घेतली जाणार, याबाबतचा निर्णय नंतर जाहीर केला जाईल.

अनेक संशयित ताब्यात; चौकशी सुरूया प्रकरणात पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. हे संशयित नेमके कोण आहेत, त्यांचा कोचिंग क्लास किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थांशी संबंध आहे का, प्रश्नपत्रिका त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली, याचा तपास सुरू आहे.पेपरफुटीचे संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात असून, या प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा : या परीक्षेची अनेक विद्यार्थ्यांनी महिनोनमहिने तयारी केली होती. परीक्षेच्या अवघ्या काही तास आधी ती स्थगित झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. आता नव्या तारखेची प्रतीक्षा त्यांना करावी लागणार आहे.यापूर्वीही पेपरफुटीचे प्रकारमागील काही वर्षांत विविध स्पर्धा परीक्षा आणि भरती परीक्षांमध्ये पेपरफुटीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे परीक्षा व्यवस्थेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. टीईटीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने परीक्षा प्रक्रियेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

तपासानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार : सध्या प्रश्नपत्रिका नेमकी कुठून बाहेर आली, किती जणांपर्यंत ती पोहोचली, त्यासाठी पैशांचा व्यवहार झाला का आणि या मागे संघटित रॅकेट कार्यरत आहे का, याचा तपास सुरू आहे. शिक्षण विभाग आणि पोलिसांच्या पुढील तपासानंतरच या संपूर्ण प्रकरणाचे खरे स्वरूप समोर येणार आहे.सोलापूरातून 28126 शिक्षक देणार होते पेपर

Previous Post

महिनाभरात २०० कोटींचा निधी, विकासकामे मार्गी लागणार – आ. राऊत

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी-२०२६ परीक्षेत घवघवीत यश

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी-२०२६ परीक्षेत घवघवीत यश

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे उन्हाळी-२०२६ परीक्षेत घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In