Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अर्ध्या तासात येतो’ सांगून घराबाहेर पडलेला जीम ट्रेनर मृतावस्थेत; १४ दिवसांनंतर झुडपात आढळला मृतदेह

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 28, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
अर्ध्या तासात येतो’ सांगून घराबाहेर पडलेला जीम ट्रेनर मृतावस्थेत; १४ दिवसांनंतर झुडपात आढळला मृतदेह
0
SHARES
313
VIEWS

चिमुकल्या ओजस्वी आणि पार्थचे छत्र हरपले ; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

सोलापूर : अर्ध्या तासात घरी येतो, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या जीम ट्रेनरचा मृतदेह चौदा दिवसांनी सैफुलजवळील काटेरी झुडपात रबरी पाईपने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. सचिन मच्छिंद्र माने (वय ३०, रा. विजापूर नाका, २ नंबर झोपडपट्टी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मृत सचिन हा १४ मार्चपासून घरातून बेपत्ता होता. याबाबत कुटुंबियांनी तो हरवल्याची फिर्यादही दिली होती. सचिनने आपण आत्महत्या करणार असल्याचे स्टेटस ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. सचिन हा शनिवार, १४ मार्च रोजी पत्नी कल्याणी यांना आपण अर्ध्या तासात घरी येणार आहे, तोपर्यंत कैरीचे लोणचे आणि भाजी बनव, असे सांगून गेला. घरातून गेल्यापासून त्याचा मोबाईल बंदच झाला. यामुळे कुटुंबियांनी याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.

पण तो शुक्रवार, २७ मार्च रोजी सकाळी मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. सचिनवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सचिनच्या पश्चात पत्नी कल्याणी, तीन वर्षांची मुलगी ओजस्वी, दीड वर्षांचा मुलगा पार्थ आहेत. सचिनचे मोबाईल शॉपीचे दुकान होते. शिवाय जीम ट्रेनर असल्याने त्याचे अनेक प्रशिक्षणार्थी व नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, प्राथमिक अहवालामध्ये गळफास घेतल्याने मृत्यू झाल्याचे आढळले आहे. याबाबतचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादा गायकवाड यांनी दिली.

प्रेमप्रकरणातून घटना…
मृत सचिन एका जीममध्ये ट्रेनिंग देत होता. तेव्हा त्याची ओळख एका महिलेसोबत झाली. त्यातून त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या कारणावरून चार दिवसांपूर्वी त्याचा वाद झाला होता. त्यानंतर त्या महिलेच्या पतीने आणि भावाने सचिनचा खून केल्याचा आरोप पत्नी कल्याणी आणि नातेवाईकांनी केला आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी करण्यात येत आहे

घटनास्थळी हे आढळले…
सैफुलजवळील एका खासगी हॉस्पिटलच्या पाठीमागील जंगलात जवळपास एक किलोमीटर दूर अंतरावर रात्री मृत सचिनची दुचाकी नातेवाईकांना दिसली. यामुळे त्यांनी सकाळी शोध सुरू केला. तेव्हा एका काटेरी झुडपात रबरी पाईपच्या सहाय्याने तो गळफास घेतलेल्या स्थितीत होता. पण त्याचा मृतदेह पूर्ण कुजलेला होता. तेथे जवळच त्याचा मोबाईल आणि चप्पल पडलेली होती. सचिनने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Tags: Crimeजीम ट्रेनरदेवेंद्र फडणवीसमृतदेहविजापूर नाका पोलिससचिन माने
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेच्या मिनी मंत्रालयावर नूतन शिलेदार; विषय समिती सभापतीचा अर्ज दाखल..

Next Post

“महानगरपालिका भरतीत स्थानिकांवर अन्याय नको; यांचे आयुक्तांना पत्र”

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
“महानगरपालिका भरतीत स्थानिकांवर अन्याय नको;  यांचे आयुक्तांना पत्र”

"महानगरपालिका भरतीत स्थानिकांवर अन्याय नको; यांचे आयुक्तांना पत्र"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025