Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजनांना मिळणार बळ; सीईओ कुशल जैन यांच्या दौऱ्याने माळशिरसच्या विकासकामांना वेग

Solapur Mirror by Solapur Mirror
April 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा योजनांना मिळणार बळ; सीईओ कुशल जैन यांच्या दौऱ्याने माळशिरसच्या विकासकामांना वेग
0
SHARES
18
VIEWS

सोलापूर माळशिरस : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आज माळशिरस पंचायत समितीला भेट देत तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी विशेषतः ध्वजांकित (फ्लॅगशिप) योजनांच्या प्रगतीची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून उभारण्यात येत असलेल्या सोलार प्रकल्पाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर वीज बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीस चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रकल्पाच्या कामाचा वेग वाढवून तो लवकर पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

त्यानंतर जैन यांनी पुरंदावडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सेवा, उपलब्ध सुविधा आणि मनुष्यबळ यांचा आढावा घेतला. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे अत्यंत महत्त्वाचे असून, त्यात कोणतीही कमतरता राहू नये, असे त्यांनी स्पष्ट केले. जलजीवन मिशन अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या पाण्याच्या टाकीचीही त्यांनी पाहणी केली. या योजनेद्वारे प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे. संबंधित कामे प्रलंबित न ठेवता नियोजित वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच तिरवंडी येथील प्राथमिक शाळेला भेट देत त्यांनी शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शाळेतील पायाभूत सुविधांची तपासणी केली. विद्यार्थ्यांना चांगले शैक्षणिक वातावरण मिळावे यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने कराव्यात, असे त्यांनी सांगितले. या दौऱ्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, माळशिरसचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. दौऱ्यामुळे तालुक्यातील विविध योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

जुळे सोलपुरातील डी मार्ट परिसरात अतिक्रमणविरोधात कारवाई

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेत शिस्तीचे वारे; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, ४३ जणांवर कारवाई

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेत शिस्तीचे वारे; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, ४३ जणांवर कारवाई

सोलापूर जिल्हा परिषदेत शिस्तीचे वारे; उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, ४३ जणांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In