Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच उपचारादरम्यान मृत्यू

Solapur Mirror by Solapur Mirror
June 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा जागीच  उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर ; सोलापूर-महामार्गावरील जवळच्या विजयपूर तेरामैल रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ भरधाव मोटरसायकलवरून सोलापूरच्या दिशेने निघालेले दोघे छोट्या पुलावरून खाली पडून गंभीर जखमी झाले. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा सोलापूरला उपचारासाठी घेऊन जाताना मृत्यू झाला. हा अपघात आज गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडला. विजय गोकुळसिंग लंगडेवाले (वय ५२, रा. हुच्चेश्वरनगर, कुमठा नाका, सोलापूर) आणि श्याम सिद्राम भोसले (वय ५७, भीमाई नगर, माशाळ वस्ती, सोलापूर) अशी त्या दोघांची नावे आहेत. मंद्रूप पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली. अधिक माहिती अशी, लंगडेवाले व भोसले मोटारसायकल (एमएच १३/ईयू ४०९५) वरून टाकळी येथे बांधकामाचे काम पाहण्यासाठी गेले होते. परत सोलापूरकडे निघाले असताना नांदणी टोलनाका ओलांडून पुढे गेले. वेगावर नियंत्रण नसल्याने मोटरसायकलसह दोघेही रिलायन्स पेट्रोल पंपाच्या अलीकडे असलेल्या छोट्या पुलावरून खाली पडले. यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते बेशुद्ध झाले. लंगडेवालेंचा जागीच मृत्यू झाला. भोसलेंचा उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जाताना मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक शंकर पटवारी, संदीप काशीद, पोलीस संदीप काळे व माजिद शेख हे घटनास्थळी गेले. अॅम्बुलन्समधून जखमी भोसले यास उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवले. लंगडेवाले यांचा मृतदेह मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.

Previous Post

एजी पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण ईव्ही बॅटरी प्रकल्प

Next Post

वंदे मातरमच्या लपलेल्या इतिहासावर सोलापुरात १४ जूनला व्याख्यान

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
वंदे मातरमच्या लपलेल्या इतिहासावर सोलापुरात १४ जूनला व्याख्यान

वंदे मातरमच्या लपलेल्या इतिहासावर सोलापुरात १४ जूनला व्याख्यान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In