Monday, October 26, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुख्याध्यापकांचा बोरडीत महामेळावा; दोनदिवसीय अधिवेशनाची घोषणा!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 11, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुख्याध्यापकांचा बोरडीत महामेळावा; दोनदिवसीय अधिवेशनाची घोषणा!
0
SHARES
53
VIEWS

पुण्यातील विश्वस्तांच्या सहविचार सभेत महत्त्वपूर्ण निर्णय; राज्यभरातील मुख्याध्यापकांच्या प्रश्नांवर होणार विचारमंथन

सोलापूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या १३ व १४ नोव्हेंबर रोजी पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बोरडी येथे आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. पुणे येथील राज्य मुख्याध्यापक संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या महामंडळाच्या विश्वस्तांच्या सहविचार सभेत हा निर्णय घेण्यात आला.

या सभेला महामंडळाचे मार्गदर्शक प्रा. सुभाष माने यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य तानाजी माने यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा उत्साहात पार पडली. राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांचे संघटन अधिक मजबूत करणे, शैक्षणिक क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीचा आढावा घेणे तसेच मुख्याध्यापकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर विचारमंथन करण्याच्या दृष्टीने आगामी अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सभेत अधिवेशनाच्या आयोजनासंदर्भात प्राथमिक चर्चा करण्यात आली. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन, विविध पदाधिकाऱ्यांचा सहभाग आणि संघटनात्मक बाबींवर उपस्थित मान्यवरांनी विचारविनिमय केला. राज्यभरातील मुख्याध्यापकांना एकत्र आणणाऱ्या या अधिवेशनाच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्याची संधी उपलब्ध होणार आहे.या सहविचार सभेला महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नलावडे-पाटील, सचिव नंदकुमार सागर, संदेश राऊत, रंगसिद्ध दसाडे, आदिनाथ बापू थोरात, सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्रीशैल्य पाटील, विष्णू मस्के, कोषाध्यक्ष लक्ष्मण शिंगाडे, उत्तमराव लवटे, दादासाहेब कोळी, पंढरपूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक यलमार यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

मुख्याध्यापकांच्या प्रश्नांना मिळणार राज्यस्तरीय व्यासपीठ ;
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण व्यवस्थेत मुख्याध्यापकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. शैक्षणिक प्रशासन, शाळा व्यवस्थापन, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्न तसेच बदलत्या शैक्षणिक धोरणांच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापकांसमोर विविध आव्हाने उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर बोरडी येथे होणारे दोनदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन मुख्याध्यापकांच्या समस्या, अपेक्षा आणि संघटनात्मक भूमिकेवर व्यापक विचारमंथन करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाकडे राज्यातील शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

Tags: प्रा. सुभाष मानेप्राचार्य तानाजी मानेमहाराष्ट्र राज्यमुख्याध्यापक
Previous Post

बातमी कशी घडते अन् कशी पोहोचते? भावी पत्रकारांनी गिरवले पत्रकारितेचे धडे!

Next Post

‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात रुपाभवानी दरबारात घटस्थापना!

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात रुपाभवानी दरबारात घटस्थापना!

‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात रुपाभवानी दरबारात घटस्थापना!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In