Saturday, June 6, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

इंगळगीत रेवणसिद्धेश्वर यात्रेनिमित्त शनिवारपासून यात्रेला सुरुवात.!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
इंगळगीत  रेवणसिद्धेश्वर यात्रेनिमित्त शनिवारपासून यात्रेला सुरुवात.!
0
SHARES
17
VIEWS

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यातील इंगळगी येथील ग्रामदैवत श्री गुरु रेवणसिद्धेश्वर यात्रेनिमित्त शनिवार, दि. 18 ते सोमवार, दि. 20 एप्रिल 2026 या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यात्रा उत्सव समितीचे सदस्य श्री शिवानंद हत्तुरे यांनी दिली.दरवर्षीप्रमाणे अक्षयतृतीयेनिमित्त या यात्रेचे आयोजन करण्यात येते.

यात्रेची सुरुवात शनिवार, दि. 18 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता गावातील सर्व ग्रामदैवतांच्या तैलाभिषेकाने व दीपोत्सवाने होणार आहे. रविवार, दि. 19 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त बैलजोड्यांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता नंदीध्वजांची मिरवणूक पार पडेल. या मिरवणुकीत वीरभद्र पुरवंत तसेच कर्नाटकातील विजापूर येथील कलाकार महिषासुर, रावण आदी ऐतिहासिक पात्रांच्या वेशभूषेत सहभागी होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता सिद्धार्थ भडकुंबे यांचा संगीत संध्या कार्यक्रम होईल, तर रात्री 8 वाजता मोहोळ येथील कीर्तनकार ह. भ. प. गोपाळ प्रकाश पाटील यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले

आहे.सोमवार, दि. 20 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता धनगरी ओव्यांचा कार्यक्रम होणार असून यात कुरघोट येथील अमोघसिद्ध गायन संघ व इंगळगी येथील बीरलिंगेश्वर गायन संघ सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजता कुस्त्यांचा फड रंगणार असून 101 रुपयांपासून ते 1 लाख रुपयांपर्यंतच्या कुस्त्या होणार आहेत. सायंकाळी 7 वाजता मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख श्री योगेश चिकटगावकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा “लोककलेची ललकार” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे.

यात्रा कालावधीत दोन्ही दिवशी रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंचक्रोशीतील नागरिकांनी या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

पाणी टंचाई निवारण आणि ‘जलजीवन’च्या कामांना प्राधान्य देणार : सोलापूर जि.प.चे नूतन CEO कुशल जैन​

Next Post

शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; आयुक्तांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी

Related Posts

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर जिल्हा

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारीत स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य द्या : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
सोलापूर जिल्हा

आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी ‘टीमवर्क’ने काम करावे : विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

June 5, 2026
वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य
सोलापूर जिल्हा

वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही तडजोड होणार नाही : जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य

June 5, 2026
Next Post
शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; आयुक्तांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी

शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; आयुक्तांनी केली मिरवणूक मार्गाची पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

शेतीपंपांना पूर्ववत वीज द्या; शेतकऱ्यांचा अंत पाहू नका : खासदार प्रणिती शिंदे

June 5, 2026
आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज; पालखी मार्गावर वाढणार सुविधा

June 5, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025