Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

डॉ. पृथ्वीराज माने यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा सन्मान

Solapur Mirror by Solapur Mirror
June 27, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
डॉ. पृथ्वीराज माने यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंतांचा सन्मान

सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. पृथ्वीराज माने यांच्या वाढदिवसानिमित्त तिर्हे येथील प्रशालेत इयत्ता पाचवी ते दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला. पृथ्वीराज माने युवा मंच, उत्तर सोलापूर आणि महाराष्ट्र परीट संघटना, पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष व युवा मंचाचे समन्वयक अजय सोनटक्के यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांनी सहकार तपस्वी ब्रह्मदेव दादा माने यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मदेवदादा माने बँकेचे अध्यक्ष सोमनाथ गायकवाड होते. शिक्षण विस्तार अधिकारी बापूराव जमादार आणि उत्तर सोलापूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष कुमार जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षक संघाचे अध्यक्ष मोरे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले, तर बापूराव जमादार यांनी “मोठे होण्यापेक्षा चांगला माणूस होणे अधिक महत्त्वाचे आहे,” असा संदेश देत विद्यार्थ्यांना समाजाभिमुख कार्याची प्रेरणा दिली.

कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाल्याबद्दल प्रशालेचे माजी विद्यार्थी इम्रान पठाण यांचा तसेच मुख्याध्यापकपदी निवड झाल्याबद्दल भाऊ काशिद यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी तिर्हेचे सरपंच गोवर्धन जगताप, सोसायटीचे अध्यक्ष भास्कर सुरवसे, माजी सरपंच नेताजी सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप सुरवसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंद जाधव, प्रशालेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनसोडे सर यांनी केले, तर आभार मुख्याध्यापक भाऊ काशिद यांनी मानले. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, प्रेरणादायी मार्गदर्शन आणि वृक्षारोपण या उपक्रमांमुळे कार्यक्रमाला सामाजिक व शैक्षणिक स्वरूप प्राप्त झाले.

Previous Post

“‘मीच केले’च्या स्पर्धेत वारकऱ्यांच्या सुविधा हरवतायत का?”वारीच्या उंबरठ्यावर ‘श्रेय’चे राजकारण

Next Post

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वाद; नेमकं काय कारण ? जाणून घ्या सविस्तर…

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वाद; नेमकं काय कारण ? जाणून घ्या सविस्तर…

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वाद; नेमकं काय कारण ? जाणून घ्या सविस्तर…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In