Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या सेवेसाठी आयुष मंत्रालयाची आरोग्यदिंडी

Solapur Mirror by Solapur Mirror
July 23, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वारकऱ्यांच्या सेवेसाठी आयुष मंत्रालयाची आरोग्यदिंडी

पंढरपूर, दि. २४ : आषाढी वारीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असताना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी आयुष मंत्रालयाने यंदा प्रथमच व्यापक स्वरूपात ‘आयुष सेवा सुविधा केंद्र’ सुरू केले आहेत. केंद्रीय आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमामुळे वारकऱ्यांना आयुर्वेद, होमिओपॅथी, योग आणि पारंपरिक भारतीय उपचार पद्धतींचा मोफत लाभ मिळणार आहे. राष्ट्रीय आयुष अभियानांतर्गत २४ ते २६ जुलै या कालावधीत पंढरपुरातील तीन रस्ता महाआरोग्य शिबिर, चंद्रभागा वाळवंट आरोग्य केंद्र आणि ६५ एकर आरोग्य केंद्र येथे सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यात आली आहेत. येथे आयुर्वेदिक व होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप, योगविषयक मार्गदर्शन, स्नेहन-स्वेदन, तेल मालिश, विद्धकर्म, अग्निकर्म, चरणसेवा तसेच आयुषविषयक जनजागृती प्रदर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमासाठी आयुष विभागातील वैद्यकीय अधिकारी, सोलापूर जिल्ह्यातील २८ आयुर्वेद व होमिओपॅथी महाविद्यालयांतील डॉक्टर, प्राध्यापक आणि इंटर्न्स यांची नियुक्ती करण्यात आली असून वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी ते कार्यरत राहणार आहेत. नेचरफिट संस्थेच्या माध्यमातून औषधांचे वितरणही करण्यात येणार आहे. दरम्यान, सेवा केंद्रांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी आयुष मंत्रालयाचे नोडल अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आयुष विभागातील अधिकाऱ्यांनी सेवा सुविधा केंद्रांची पाहणी करून आवश्यक नियोजनाचा आढावा घेतला.

आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना आधुनिक आरोग्य सुविधांसोबतच भारतीय पारंपरिक उपचार पद्धतींचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत असून, त्याला वारकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालयात आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, आयुष मंत्रालयातर्फे नियुक्त नोडल अधिकारी चंद्रकांत काटकर, युवराज वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, आयुष नोडल अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांच्या समवेत बैठक झाली. त्यानंतर सेवा सुविधा केंद्रावर जाऊन व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.

Tags: अग्निकर्मआयुष मंत्रालयआरोग्यदिंडीउपसंचालक डॉ. भगवान पवारचंद्रभागा वाळवंटचरणसेवाजिल्हा शल्यचिकित्सकडॉ. वर्षा डोईफोडेडॉ. सतिश कोपुरवाडतेल मालिशदेवेंद्र फडणवीसनोडल अधिकारी डॉ. हर्षल जाधवपंढरपूरविद्धकर्मसोलापूरस्नेहन-स्वेदन
Previous Post

वारकऱ्यांच्या सेवेत ‘चरणसेवा’; ४.९६ लाख भाविकांना दिलासा

Next Post

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ सोलापुरात ४०० वकिलांचा एल्गार

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ सोलापुरात ४०० वकिलांचा एल्गार

दिल्लीतील लाठीचार्जच्या निषेधार्थ सोलापुरात ४०० वकिलांचा एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In