सोलापूर महानगरपालिकेतील कर निर्धारक व संकलन अधिकारी (सहआयुक्त, गट-अ) यांची प्रशासकीय कारणास्तव सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात संकलन अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाने सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने हा आदेश जारी केला आहे लोकरे हे सध्या सोलापूर महानगरपालिकेत कर निर्धारक व संकलन अधिकारी म्हणून कार्यरत असून, जिल्हाधिकारी कार्यालयातील रिक्त पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या आदेशानुसार त्यांना १७ जून २०२६ रोजी मध्यान्हानंतर विद्यमान पदावरून कार्यमुक्त करण्यात येणार असून, १८ जून रोजी नव्या पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नव्या पदावर रुजू झाल्यानंतर त्याबाबतचा अनुपालन अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत.
महसूल प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या दृष्टीने ही बदली करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला असून, शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले आहेत.













