Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीसाठी ; ६१५ मतदार बजावणार मतदानाचा उद्या हक्क

Solapur Mirror by Solapur Mirror
June 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
विधान परिषद निवडणुकीसाठी ; ६१५ मतदार बजावणार मतदानाचा उद्या हक्क
0
SHARES
53
VIEWS

सोलापूर, – सोलापूर जिल्ह्यातील विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील सहा मतदान केंद्रावर एकूण ६१५ मतदार(एक मतदार मयत) मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नियोजन भवन येथून सहा मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष व अन्य अधिकारी कर्मचारी यांनी निवडणूक साहित्य घेऊन निवडणूक केंद्रावर रवाना झालेले आहेत. ही निवडणूक प्रक्रिया निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तीकेयन यांनी दिली.

  • अधिसूचना –
    या निवडणुकीसाठी अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध झाली असून नामनिर्देशन दाखल करण्याची शेवटची तारीख १ जून होती. छाननी २ जून रोजी पार पडली तर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ४ जून होती. मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून मतमोजणी २२ जून रोजी सकाळी ८ वाजता नियोजन भवन, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे होणार आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपर्यंत पूर्ण होणार आहे.
  • निवडणूक निरीक्षक:-
    या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून आयएएस अधिकारी श्री. श्रवण पी. हार्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी सोलापूर हे निवडणूक निर्णय अधिकारी असून निवासी उपजिल्हाधिकारी सोलापूर हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
  • एकूण मतदार संख्या:-
    जिल्ह्यातील स्थानिक संस्थांमध्ये एक जिल्हा परिषद, एक महानगरपालिका व १७ नगरपरिषद/नगरपंचायत अशा एकूण १९ संस्था असून त्यातील मतदारसंख्या ५४४ आहे. याशिवाय ४९ नामनिर्देशित व २३ अध्यक्ष मिळून एकूण मतदारसंख्या ६१६ इतकी आहे.या निवडणुकीसाठी एकूण १५ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. अंतिमतः २ उमेदवार निवडणुकीत उभे राहिले आहेत.
  • मतदान केंद्र व अधिकारी :-
    जिल्ह्यात एकूण ६ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. कुर्डूवाडी येथे ८०, उत्तर सोलापूर येथे १८८, दक्षिण सोलापूर येथे ८९, पंढरपूर येथे १००, मंगळवेढा येथे ६२ व अकलूज येथे ९७ मतदारांची व्यवस्था असून पुरुष व महिला मतदारांची संख्या प्रत्येकी ३०८ अशी आहे.मतदान केंद्रांवर तहसीलदार हे केंद्राध्यक्ष असतील. नायब तहसीलदार, अव्वल कारकून, लिपिक व शिपाई यांची नेमणूक मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून करण्यात आली आहे. तसेच सूक्ष्म निरीक्षकांचीही नेमणूक झाली आहे.
  • मतदारांची ओळख:-
    मतदारांची ओळख पटविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.या निवडणुकीत एक मृत मतदाराची नोंद झाली असून दिव्यांग मतदारांची संख्या शून्य आहे. प्रतिबंधात्मक नजरकैदेत असलेले मतदारही शून्य आहेत.SVEEP उपक्रमांतर्गत ६१६ मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यात आली आहे. उमेदवारांची बैठक घेण्यात आली असून त्यांना मतदान केंद्रांची यादी व मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली आहे.
  • पसंती क्रमांक व जांभळा स्केचपेन-
    मतदानासाठी मतदारांनी उमेदवाराच्या नावासमोर पसंतीक्रम अंकात लिहावा लागणार आहे. पहिली पसंती दर्शविण्यासाठी ‘१’ अंक लिहिणे बंधनकारक आहे. भारत निवडणूक आयोगाने पुरविलेला जांभळा स्केचपेन वापरणे आवश्यक आहे. अंक शब्दांत लिहिल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने नोंदवल्यास मतपत्रिका अवैध ठरेल.
  • प्रशिक्षण:-
    या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचारी व सूक्ष्म निरीक्षक यांना निवडणूक विभागाच्या वतीने चार प्रशिक्षण देण्यात आलेले आहेत. प्रशिक्षण दरम्यान प्रत्येकाचे जबाबदारी व कर्तव्य सांगण्यात आलेली असून त्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया कशा पद्धतीने घ्यावयाची याचे ही प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी निवडणुकीसाठी प्रशिक्षित झालेले आहे.

मतदान साहित्य वितरण-
मतदान साहित्याचे वितरण १७ जून रोजी नियोजन भवन, नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे झाले आहे. सहा मतदान केंद्रावर मतदान अधिकारी व कर्मचारी साहित्यासह रवाना झालेले आहेत.

संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व काटेकोरपणे पार पडावी यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडणार आहे

Previous Post

मतपेट्यांच्या सुरक्षेसाठी हार्डीकरांचे स्पष्ट निर्देश; चोख बंदोबस्तावर भर

Next Post

महानगरपालिकेचे सहआयुक्त लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
महानगरपालिकेचे सहआयुक्त लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

महानगरपालिकेचे सहआयुक्त लोकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025