सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक प्राधिकरणाच्या मतदानाला आज, १८ जून २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजल्यापासून उत्साहात सुरुवात झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून मिळालेल्या पहिल्या दोन तासांच्या (सकाळी ८.०० ते १०.०० वाजेपर्यंत) अधिकृत आकडेवारीनुसार, जिल्ह्यात सरासरी ११.८५ टक्के मतदान झाले आहे.

यामध्ये उत्तर सोलापूर केंद्रावर मतदारांचा सर्वाधिक उत्साह पाहायला मिळाला, तर पंढरपूर केंद्रावर पहिल्या दोन तासांत मतदानाचा टक्का शून्य राहिला. उत्तर सोलापूरमध्ये जोरदार सुरुवात सकाळी पहिल्या दोन तासांत उत्तर सोलापूर (केंद्र क्र. ००२) येथे सर्वाधिक २४.४७ टक्के मतदान झाले. या केंद्रावरील एकूण १८८ मतदारांपैकी ४६ मतदारांनी (२२ पुरुष आणि २४ महिला) आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्याखालोखाल मंगळवेढा (केंद्र क्र. ००५) येथे ३७.१० टक्के (६२ पैकी २३ मतदान) नोंदवले गेले आहे.पंढरपूरमध्ये संथ वातावरण, अकलूज-कुर्डूवाडीत अल्प प्रतिसाददुसऱ्या बाजूला, पंढरपूर (केंद्र क्र. ००४) येथे पहिल्या दोन तासांत एकही मतदान झाले नाही, त्यामुळे येथील टक्केवारी ०.००% इतकी आहे. कुर्डूवाडी (१.२५%), दक्षिण सोलापूर (१.१२%) आणि अकलूज (२.०६%) या केंद्रांवर मतदानाची सुरुवात अत्यंत संथ गतीने झाली आहे.
सकाळी 8 ते दहा वाजेपर्यंत ची आकडेवारी व पडलेली मते..
- 1) कुर्डूवाडी : (80 मते)
- 2) उ. सोलापूर : 188
- 3) द. सोलापूर : 89
- 4) पंढरपूर: 100
- 5) मंगळवेढा : 62
- 6) अकलूज : 97

एकूण ६१६ मतदारांपैकी पहिल्या दोन तासांत ७३ मतदारांनी (३६ पुरुष आणि ३७ महिला) मतदान केले आहे. मतदानाची वेळ सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत असून, दुपारनंतर मतदानाचा वेग वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तवली जात आहे.











