Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व

Solapur Mirror by Solapur Mirror
April 15, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
नवदाम्पत्याने बालकाश्रमातील दोन मुलांचे घेतले शैक्षणिक पालकत्व
0
SHARES
32
VIEWS

सोलापूर : आजच्या काळात विवाह सोहळा म्हटलं की डोळ्यासमोर येतात ते लाखो रुपयांचे खर्च, डीजेचा आवाज आणि भव्य सजावट. मात्र, या सर्व दिखाव्याला फाटा देत सोलापूर जिल्ह्यातील एका नवदाम्पत्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून समाजासमोर एक नवा आणि आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे. शुभम मिसाळ आणि धनश्री सुर्वे या दांपत्याने आपला विवाह सोहळा बालकाश्रम व वृद्धाश्रमात साजरा करत सामाजिक संवेदनेचा परिचय करून दिला आहे.

शुभम आणि धनश्री या दोघांचेही शिक्षण ‘सामाजिक कार्य’ (MSW) या विषयात झाले आहे. आपल्या शिक्षणाचा आणि विचारांचा वारसा त्यांनी केवळ पुस्तकी न ठेवता प्रत्यक्ष आयुष्यात उतरवला. मोरवंची येथील प्रार्थना फौंडेशन संचलित बालकाश्रम आणि वृद्धाश्रमात हा विवाह सोहळा पार पडला. वंचितांच्या सहवासात लग्नगाठ बांधून त्यांनी “विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर समाजाशी नातं जोडणारा संस्कार आहे” हा संदेश दिला. विवाहातील महत्त्वाचे आदर्श उपक्रम लग्नात भेट म्हणून मिळालेली सर्व रक्कम त्यांनी बालकाश्रमातील एका मुलाच्या आणि एका मुलीच्या शिक्षणासाठी अर्पण केली. या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेण्याचा संकल्प या दांपत्याने केला आहे.

लग्नाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. “एक झाड म्हणजे एक जीवन” हा संदेश देत त्यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित केली. आजी-आजोबांचा आशीर्वाद: वृद्धाश्रमातील निराधार आजी-आजोबांसोबत वेळ घालवून त्यांना आपुलकीची भेट दिली, तर बालकाश्रमातील चिमुकल्यांसोबत लग्नाचा आनंद वाटून घेतला. या आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याला प्रसाद मोहिते, अनु मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रसिद्ध लोकव्याख्यानकार प्रा. विशाल गरड यांनी विशेष उपस्थिती लावून या उपक्रमाचे कौतुक केले. समाजात बदल घडवायचा असेल तर तो स्वतःपासून सुरू करावा लागतो, हे या नवदाम्पत्याने सिद्ध केल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. लाखो रुपये खर्च करून थाटामाटात लग्न करणाऱ्या आजच्या पिढीसमोर शुभम आणि धनश्री यांनी ठेवलेला हा आदर्श निश्चितच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहे.

Previous Post

सोलापूरकरांच्या अंगाची लाहीलाही; पारा ४३.३ अंशांवर, रात्रीही उकाडा कायम

Next Post

सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली

सोलापूर जिल्हा परिषदेचे कुशल जैन नवे CEO तर ; कुलदीप जंगम आता पिंपरी-चिंचवडला बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In