Friday, June 5, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

एकीकडे विद्यार्थ्यांची ऍडमिशनची घाई दुसरीकडे शासनाच्या सर्वरची दिरंगाई..

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
May 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
एकीकडे विद्यार्थ्यांची ऍडमिशनची घाई दुसरीकडे शासनाच्या सर्वरची दिरंगाई..
0
SHARES
82
VIEWS

सोलापूर : सध्या दहावी आणि बारावीच्या निकालानंतर महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असताना विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे काढण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याची तक्रार समोर येत आहे. शाळा-महाविद्यालयातील प्रवेशासाठी लागणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, शुद्धीकरण व इतर आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी विद्यार्थी आणि पालक विविध शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारत आहेत.

विद्यार्थी व पालकांच्या म्हणण्यानुसार, काही ऑनलाइन सेवा आणि शासकीय प्रणालींचा वेग मंद असल्याने अर्ज प्रक्रिया रखडत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यामुळे दाखले मिळण्यास विलंब होत असून प्रवेश प्रक्रियेच्या मुदती लक्षात घेता अनेक विद्यार्थी चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.निकालानंतर प्रवेशासाठी कमी कालावधी उपलब्ध असताना आवश्यक कागदपत्रे वेळेत मिळाली नाहीत, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, अशी भीती पालकांकडून व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचेही सांगितले जात आहे.

विद्यार्थ्यांच्या मते, ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी, सर्व्हरवरील ताण किंवा प्रक्रिया संथ गतीने होत असल्यामुळे वेळ वाया जात आहे. काही विद्यार्थ्यांनी “एकच कागदपत्र काढण्यासाठी अनेक वेळा कार्यालयात जावे लागत आहे” अशी नाराजी व्यक्त केली.या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देत सेवा सुरळीत कराव्यात, अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा केंद्र सुरू करावीत, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे. प्रवेश प्रक्रियेचा काळ लक्षात घेता विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी संबंधित विभागांनी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.दरम्यान, संबंधित प्रशासनाकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र, विद्यार्थ्यांच्या अडचणींवर तातडीने उपाययोजना होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सेतू चालकाचे म्हणणे;

सध्या विद्यार्थ्यांचे दाखले काढण्याचे दिवस चालू झाले आहे आम्ही विद्यार्थ्यांची अडचण समजू शकतो पण शासनाच्या सर्वरवर सर्वकाही अवलंबून आहे. सर्वर जर साथ देत नसेल तर आम्ही काय करणार..

अमोल सुरवसे ; सेतू व्यवस्थापक

Tags: आशिष शेलारदेवेंद्र फडणवीसमंत्रीमाहिती तंत्रज्ञानसेतू
Previous Post

३२ वर्षे पक्षासाठी झिजलेले शहाजी पवार; कार्यकर्त्यांकडून “आता बापूंची बारी”ची जोरदार मागणी

Next Post

१३० कोटींची थकबाकी; ‘गोकुळ’विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या

Related Posts

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..
सोलापूर जिल्हा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज
सोलापूर जिल्हा

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली
सोलापूर जिल्हा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

June 2, 2026
१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग
सोलापूर जिल्हा

१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

June 2, 2026
आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
सोलापूर जिल्हा

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

June 2, 2026
Next Post
१३० कोटींची थकबाकी; ‘गोकुळ’विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या

१३० कोटींची थकबाकी; ‘गोकुळ’विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025