No Result
View All Result
अक्कलकोट शहर : शासनाच्या आदेशानुसार शेतातील पिकांची पाहणी विनाशुल्क करणे अपेक्षित असताना, पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडे २०० ते ५०० रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून खैराट (ता. अक्कलकोट) येथील महसूल सेवक हनुमंत सुरेश जाधव याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पैसे न दिल्यास पीक पाहणी करणार नसल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी ग्राम महसूल अधिकारी यश सुरेश केंद्रे (वय २६, रा. हाडाळी बी.एस., ता. कंधार, जि. नांदेड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास खैराट येथे हा प्रकार घडला. या घटनेची नोंद मंगळवारी (ता. १३) रोजी पोलिस ठाण्यात झाली. शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी विनाशुल्क करणे अपेक्षित असतानाही संबंधित महसूल सेवकाने पीक पाहणीसाठी २०० ते ५०० रुपये मागितल्याचा आरोप आहे. पैसे न दिल्यास पीक पाहणी करणार नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.
No Result
View All Result