Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

Solapur Mirror by Solapur Mirror
June 6, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश
0
SHARES
35
VIEWS

सोलापूर : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अवैध हातभट्टी व्यवसायावर अंकुश आणण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे छापा टाकून तब्बल ७ लाख ४७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सोलापूर तालुका पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.

छाप्यादरम्यान अवैध हातभट्टी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे गुळमिश्रित रसायन, लोखंडी बॅरल, प्लास्टिक ड्रम, चुली तसेच इतर साहित्य मोठ्या प्रमाणात आढळून आले.कारवाईची विशेष बाब म्हणजे अवैध हातभट्टी निर्मितीचे अड्डे कायमस्वरूपी उद्ध्वस्त करण्यासाठी जेसीबी मशीनच्या सहाय्याने संपूर्ण साहित्य आणि संरचना नष्ट करण्यात आली. तसेच परिसरातील इतर संशयित ठिकाणांचा शोध घेण्यासाठी आणि संपूर्ण कारवाईवर देखरेख ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला.या प्रकरणी अवैध हातभट्टी निर्मितीसाठी साहित्य बाळगल्याप्रकरणी चार सराईत हातभट्टी व्यवसायिकांविरोधात सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अवैध दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर केवळ गुन्हे दाखल करून न थांबता हद्दपार, एमपीडीएसारख्या प्रतिबंधात्मक कारवाया देखील करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर तालुका पोलीस ठाणे, आरसीपी पथक आणि ड्रोन पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली. या कारवाईमुळे अवैध हातभट्टी व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Tags: अवैध दारूउध्वस्तग्रामीण पोलीसपुणे शाखामुळेगाव तांडासोलापूरहातभट्टी
Previous Post

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

Next Post

कारंबा जवळ भीषण अपघात; डंपरच्या धडकेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
कारंबा जवळ भीषण अपघात; डंपरच्या धडकेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

कारंबा जवळ भीषण अपघात; डंपरच्या धडकेत शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025