कोल्हापूर, दि. 30 : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिवा व प्राचार्या सौ. शुभांगी मुरलीधर गावडे (वय 53) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या नात, कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कन्या तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांच्या मातोश्री होत्या.
2008 पासून सचिवा म्हणून कार्यरत राहून त्यांनी संस्थेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या विविध शाखांमध्ये आधुनिक अभ्यासक्रम व उपक्रम राबवून संस्थेचा नावलौकिक वाढविला.त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी 1 मे रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत स्मृतिभवन, ताराबाई पार्क येथे ठेवण्यात येणार असून, अंत्यविधी दुपारी 12 वाजता पंचगंगा स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.