Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधील शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सोडवला प्रश्न…!

Solapur Mirror by Solapur Mirror
December 18, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या शाळांमधील शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी सोडवला प्रश्न…!
0
SHARES
102
VIEWS

सोलापूर ; सोलापूर जिल्ह्यातील रयत शिक्षण संस्थेच्या विविध शाळांमधील एकूण २७ मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक यांच्या पदोन्नतीनंतर तब्बल आठ महिन्यांपासून प्रलंबित असलेला पदमान्यता व वेतनाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. हा प्रश्न श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचे संस्थापक तसेच स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या प्रभावी प्रयत्नांमुळे सुटला आहे.

मागील वर्षी रयत शिक्षण संस्थेतील २७ शिक्षकांची विविध पदांवर पदोन्नती झाली होती. मात्र, पदमान्यतेसंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया रखडल्याने काही शिक्षकांचे वेतन थांबले होते, तर काही शिक्षकांना पदोन्नतीच्या पूर्वी असलेल्या पदानुसार कमी वेतन दिले जात होते. परिणामी, शिक्षकांमध्ये अनिश्चितता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. रोंगे यांनी माध्यमिक शिक्षण विभागाचे जिल्हा शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची भेट घेऊन प्रकरणाची सविस्तर पाहणी केली.

तांत्रिक अडचणी, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि प्रशासकीय प्रक्रिया यांवर झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर अखेर या प्रलंबित प्रश्नाचा मार्ग सुकर झाला. निर्णयानंतर संबंधित शिक्षकांना पदमान्यता मिळाली असून त्यांचे रखडलेले वेतनही मंजूर झाले आहे. त्यामुळे संबंधित शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्याकडून याबाबत समाधान व्यक्त होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातून या निर्णयाचे स्वागत होत असून, शिक्षकांनी डॉ. रोंगे यांच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केलेआहे.

शिक्षकांच्या अडचणींना प्राधान्य देत प्रशासनाशी सातत्याने संवाद साधणारे आणि प्रश्न सोडवण्यासाठी ठाम भूमिका घेणारे नेतृत्व म्हणून डॉ. बी. पी. रोंगे यांची भूमिका महत्वाची ठरली आहे.

या प्रसंगी प्राचार्य के. के. जाधव (भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंकोली), प्राचार्य मिसाळ (न्यू इंग्लिश स्कुल, रिधोरे), प्राचार्य केत (रावजी सखाराम हायस्कुल, सोलापूर), प्राचार्य के. डी. शिंदे (न्यू इंग्लिश स्कुल, भाळवणी), प्राचार्य रोकडे (न्यू इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी), प्रा. बाळासाहेब शिंगाडे (विवेकवर्धिनी विद्यालय, पंढरपूर), पर्यवेक्षक एस. जी. जरे (यशवंत विद्यालय, भोसे) व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Tags: sachin jagtap
Previous Post

राज्य उत्पादन शुल्क विभागाने १९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त .

Next Post

उमेदवारी अर्ज भरायला जाताना फक्त इतक्याच लोकांना मिळणार प्रवेश…

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
उमेदवारी अर्ज भरायला जाताना फक्त इतक्याच लोकांना मिळणार प्रवेश…

उमेदवारी अर्ज भरायला जाताना फक्त इतक्याच लोकांना मिळणार प्रवेश...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In