सोलापूर : संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी संचलित संगमेश्वर रात्र महाविद्यालय, सोलापूर येथे शैक्षणिक वर्षासाठी बी.ए. व बी.कॉम. (प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष) या सर्व वर्गांसाठी थेट प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.काम करणाऱ्या तसेच शिक्षणाबरोबर नोकरी सांभाळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय विशेषतः उपयुक्त ठरत असून अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, डिजिटल ग्रंथालय, संगणक सुविधा आणि ऑनलाईन शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. महाविद्यालय परिसरात संपूर्ण वाय-फाय कनेक्टिव्हिटी असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध पूरक अभ्यासक्रम व कौशल्यविकास कोर्सेस राबवले जातात.
याशिवाय, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा, उत्कृष्ट क्रीडा परंपरा तसेच सातत्यपूर्ण मूल्यमापन व प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात येतो. महाविद्यालय हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्न आहे.प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.

प्रवेश प्रक्रिया साठी संपर्क : कला विभाग : 9823066561 / 9850459117, 8275207803 / 9146032473
वाणिज्य विभाग : 9309797932 8432136565, 7888108107, 9552746417
अधिक माहितीसाठी : आर.एस.कोरे 9673967219
शरणबसवेश्वर वांगी : 9146032473
ईमेल : sannightcollege@gmail.कॉम
वेबसाईट : www.sangameshwarnightcollege.in











