Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी साडेतीन हजार पोलीसांसह यंत्रणा सज्ज

Solapur Mirror by Solapur Mirror
July 21, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी साडेतीन हजार पोलीसांसह यंत्रणा सज्ज

३४२ अधिकारी, ३,५२८ पोलीस, ३,११० होमगार्ड तैनात; ४६ वॉच टॉवर, ३५२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून नजर

पंढरपूर, दि. २१ : आषाढी शुद्ध एकादशी (२५ जुलै) निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि यात्रा निर्विघ्नपणे पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.

वारीदरम्यान सुरक्षा आणि वाहतूक नियंत्रणासाठी ३४२ पोलीस अधिकारी, ३,५२८ पोलीस अंमलदार आणि ३,११० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एक पोलीस अधीक्षक, चार अपर पोलीस अधीक्षक, २२ पोलीस उपअधीक्षक, ५३ पोलीस निरीक्षक, २६३ सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. याशिवाय सात एसआरपीएफ कंपन्या, दहा बॉम्ब शोधक व नाशक (बीडीएस) पथके, एक आरसीपी पथक, तीन क्यूआरटी पथके आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी १६ प्रशिक्षित ‘कार्ट’ पथके तैनात करण्यात आली आहेत.

चंद्रभागा नदी परिसरातील सुरक्षेसाठी १० ठिकाणी होडी नियंत्रक पथके स्थापन करण्यात आली असून जलसंपदा विभाग आणि पोलीस प्रशासन संयुक्तपणे काम करत आहेत.भाविकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी नदीपात्र, ६५ एकर परिसर, महाद्वार, महाद्वार घाट, पत्राशेडसह महत्त्वाच्या ठिकाणी ४६ वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. तसेच ३५२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून संपूर्ण यात्रा परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.

चोरी व इतर अनुचित प्रकार रोखण्यासाठी ‘माऊली स्कॉड’ कार्यरत करण्यात आले असून, वारकरी व सामान्य नागरिकांच्या वेशात पोलीस कर्मचारी गर्दीत तैनात राहणार आहेत. भाविकांच्या मदतीसाठी १३ तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात आली असून सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट, अंबाबाई पटांगण आदी ठिकाणी ही केंद्रे कार्यरत आहेत. तसेच ध्वनीक्षेपक यंत्रणेद्वारे भाविकांना सातत्याने आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत. वारीदरम्यान वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. १३ डायव्हर्जन पॉइंट आणि १७ वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामुळे भाविकांना वाहतुकीचा अडथळा येणार नाही, असे नियोजन करण्यात आले आहे.

आषाढी वारी शांततापूर्ण, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी केले.

Previous Post

सोलापूर शहरात सलग तिसऱ्या दिवशी रिमझिम पावसाची हजेरी

Next Post

बांधकाम विभागाचा ‘शिलेदार’ आता एमएसआरडीसीच्या धुर्यावर!

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
बांधकाम विभागाचा ‘शिलेदार’ आता एमएसआरडीसीच्या धुर्यावर!

बांधकाम विभागाचा 'शिलेदार' आता एमएसआरडीसीच्या धुर्यावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In