Tuesday, September 8, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर, मुंबई, पुणे, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार

Solapur Mirror by Solapur Mirror
April 17, 2026
in सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा
0
सोलापूर, मुंबई, पुणे, बंगळुरू नवीन वंदे भारत, वेळ आणि पैसा वाचणार
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : मुंबई ते बंगळुरू प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय रेल्वे लवकरच अत्याधुनिक आणि वेगवान स्लीपर सुविधेसह ‘वंदे भारत’ एक्सप्रेस सुरू करण्याच्या तयारीत असून, या नव्या सेवेचा सर्वाधिक लाभ पुणे आणि सोलापूर मार्गावरील प्रवाशांना होणार आहे.

प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असल्याने ही ट्रेन दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणार आहे. यामुळे पुणे, सोलापूर आणि बंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अधिक आरामदायी आणि जलद पर्याय उपलब्ध होणार आहे. देशातील दुसरी आणि महाराष्ट्रातील पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस लवकरच धावणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली असून मुंबई-बंगळुरू या मार्गावर ही ट्रेन सुरू होणार आहे.पुणे ते बंगळुरू दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्याचप्रमाणे सोलापूरहून पुणे आणि मुंबईकडे ये-जा करणारे प्रवासीही मोठ्या प्रमाणात आहेत. सध्या या मार्गावर प्रवासासाठी १८ ते २० तासांचा कालावधी लागतो.

मात्र, वंदे भारत स्लीपर एक्सप्रेसमुळे हा प्रवास अवघ्या १२ ते १३ तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे तब्बल ६ ते ७ तास वाचणार आहेत.ही स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू होऊन पुणे, सोलापूर आणि वाडी मार्गे बंगळुरूकडे जाणार आहे. काही पर्यायी मार्गांमध्ये कलबुर्गी किंवा हुबळी मार्गाचाही विचार सुरू आहे. गाडीचा वेग सुमारे १३० किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही नवीन सेवा सुरू झाल्यानंतर सध्या धावणाऱ्या उद्यान एक्सप्रेससारख्या गाड्या बंद होणार नाहीत. दोन्ही सेवा एकत्र सुरू राहणार असल्याने प्रवाशांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Tags: DRMवंदे भारत ट्रेनसोलापूरसोलापूर रेल्वे स्थानक
Previous Post

सोरेगांव येथे 17 एप्रिल रोजी महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

Next Post

भगवान परशुराम जयंतीची भव्य मिरवणूक १९ एप्रिल रोजी निघणार

Related Posts

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे
सोलापूर जिल्हा

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा
सोलापूर जिल्हा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
सोलापूर जिल्हा

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन
सोलापूर जिल्हा

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींना उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन

September 8, 2026
किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात
सोलापूर जिल्हा

किसन जाधव यांच्या पुढाकाराने श्रीकृष्ण मठात भक्तीचा जल्लोष; गुलाल सोहळा थाटात

September 7, 2026
‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!
क्राईम

‘युट्युब’वर कुलूप तोडण्याची ट्रिक पाहिली अन् जामगावात केला रक्तरंजित चोरीचा डाव!

September 7, 2026
Next Post
भगवान परशुराम जयंतीची भव्य मिरवणूक १९ एप्रिल रोजी निघणार

भगवान परशुराम जयंतीची भव्य मिरवणूक १९ एप्रिल रोजी निघणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

फडणवीसांचा विश्वासू, सोलापूर विकासाचा पाठीराखा ; देवेंद्र कोठे

September 8, 2026
‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

‘फिटनेस विथ रिअल हॅपिनेस’चा सातारा हिलवर जलवा

September 8, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 8, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In