Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूरकर सज्ज; गजानन महाराज पालखी १७ जुलैला सोलापुरात

Solapur Mirror by Solapur Mirror
July 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सोलापूरकर सज्ज; गजानन महाराज पालखी १७ जुलैला सोलापुरात

सोलापूर : शेगावचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज यांची पालखी येत्या १७ जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार असून, यंदा सोलापूर शहरात पालखीचा तब्बल तीन दिवस मुक्काम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूरकर आणि गजानन भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियोजनानुसार, १७ जुलै रोजी तामलवाडी मार्गे प्रवास करत दुपारी सुमारे ४ वाजता पालखी उळे येथे मुक्कामासाठी दाखल होणार आहे. त्यानंतर १८ जुलै रोजी सकाळी ९ वाजता रुपाभवानी मंदिर येथे पालखीचे आगमन होईल. येथे मान्यवरांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात येणार आहे.

यानंतर सम्राट चौक येथील श्री प्रभाकर महाराज मठात दोन पालख्यांची पारंपरिक व ऐतिहासिक भेट होणार आहे. सायंकाळी पालखी कुचन प्रशाला येथे पोहोचेल. तेथे भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून पालखीचा मुक्कामही तेथेच राहणार आहे. १९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता पालखी कुचन प्रशालेतून प्रस्थान करेल. सकाळी ११ वाजता उपलप मंगल कार्यालय येथे पालखीचे आगमन होणार असून, येथे महाप्रसादासह मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यानंतर २० जुलै रोजी सकाळी ७ वाजता पालखी तिहे-जगाव मार्गे पुढील प्रवासाला सुरुवात करेल. २१ जुलै रोजी कामतीमार्गे माचणूर येथे, तर २२ जुलै रोजी ब्रह्मपुरीमार्गे मंगळवेढा येथे पालखीचा मुक्काम राहणार आहे. दरम्यान, २३ जुलै रोजी संत गजानन महाराजांची पालखी मंगळवेढ्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. २३ ते २८ जुलै या कालावधीत पालखीचा मुक्काम पंढरपूर येथे राहणार असून, या कालावधीत हजारो भाविक दर्शनासाठी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

Previous Post

दरडी कोसळल्याने रेल्वे वाहतूक प्रभावित; वंदे भारतची सेवा कायम

Next Post

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In