Tuesday, October 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा ठसा!

Solapur Mirror by Solapur Mirror
September 17, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
‘बाप्पा डॉट ओआरजी’वर सोलापूरच्या गणेशोत्सवाचा ठसा!
0
SHARES
4
VIEWS

कथा, परंपरा, आरत्या, पाककृती अन् छायाचित्रे अपलोड करा; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आवाहन

सोलापूर, : सोलापूर जिल्ह्यातील गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, कला, संस्कृती आणि वैशिष्ट्यपूर्ण आठवणी आता डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, ग्रामपंचायती, सामाजिक-सांस्कृतिक संस्था तसेच नागरिकांनी या डिजिटल लोकचळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा. आपल्या परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण कथा, परंपरा, पाककृती, आरत्या आणि छायाचित्रे ‘बाप्पा डॉट ओआरजी’ (bappa.org) या संकेतस्थळावर अपलोड करून सोलापूरचा सांस्कृतिक वारसा जगासमोर मांडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवातील परंपरा, कला, विधी आणि आठवणींचे डिजिटल स्वरूपात जतन करून त्या जागतिक पटलावर मांडण्यासाठी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानंतर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील गणेशोत्सवाशी संबंधित कला, संस्कृती, खाद्यपरंपरा, मूर्तिकला, आरत्या आणि लोककलांचे डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. पुरातत्त्व संचालनालयाने विकसित केलेल्या या डिजिटल मंचावर नागरिकांना घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील छायाचित्रे, व्हिडिओ, पाककृती, आरत्या, परंपरा आणि गणेशोत्सवाशी संबंधित आठवणी अपलोड करता येणार आहेत. त्यामुळे पिढ्यान्‌पिढ्या जपल्या गेलेल्या स्थानिक परंपरांना डिजिटल स्वरूपात कायमस्वरूपी जतन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

सोलापूरची सांस्कृतिक ओळख जगभर पोहोचणार

सोलापूर जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, आकर्षक सजावट, खाद्यसंस्कृती, मूर्तिकला आणि विविध लोककलांची नोंद या माध्यमातून करता येणार आहे. या उपक्रमामुळे सोलापूरची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख देश-विदेशात पोहोचण्यास मदत होणार असून, स्थानिक कलावंतांना व्यापक व्यासपीठ मिळण्यासोबतच सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

सहभाग नोंदवा अन् मिळवा डिजिटल प्रमाणपत्र

या डिजिटल अभियानात आपल्या परिसराची माहिती नोंदविणाऱ्या नागरिकांना शासनाच्या वतीने ‘डिजिटल कल्चरल प्रिझर्वर प्रमाणपत्र’ देऊन गौरविण्यात येणार आहे. नागरिकांनी ‘बाप्पा डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर जाऊन ‘तुमची कथा सांगा’ या पर्यायातून आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित कथा, पाककृती, परंपरा अथवा आरतीची माहिती भरावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे दर्शन घडविणारा उत्सव आहे. त्यामुळे सोलापूरच्या गणेशोत्सवातील आगळ्या-वेगळ्या परंपरा आणि आठवणी या डिजिटल व्यासपीठावर मोठ्या प्रमाणात नोंदवाव्यात, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

Previous Post

‘सेवा संकल्प’चा श्रीगणेशा! ३३२ नूतन शिक्षकांना जागेवर नियुक्ती आदेश

Next Post

‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना!’

Related Posts

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!
सोलापूर जिल्हा

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!
सोलापूर जिल्हा

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..
सोलापूर जिल्हा

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!
सोलापूर जिल्हा

रामायणातून जीवनमूल्यांची शिकवण; पंचाक्षरी विद्यामंदिरात वाल्मिकी जयंती साजरी..!

October 26, 2026
४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!
सोलापूर जिल्हा

४६ कोटींची ऊसबिले थकली; दोन कारखान्यांच्या गाळपावर टांगती तलवार!

October 26, 2026
रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!
क्राईम

रेल्वे स्थानकावर पर्स लांबवली; पण पोलिसांनी अखेर गाठलेच!

October 26, 2026
Next Post
‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना!’

‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना!’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

कचरा संकलनाच्या कंत्राटातील ‘गोलमाल’ ; पाच सदस्यीय चौकशी समिती गठीत!

October 26, 2026
‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

‘उमेद’मध्ये लाखोंचा झोल? बनावट धनादेशांच्या आरोपांनी खळबळ!

October 26, 2026
सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

सुरेश हसापुरेंसह २१९ जणांनी घेतला उमेदवारीचा अर्ज..

October 26, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In