Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कुशल जैन यांच्या पुढाकाराची ‘हृदयस्पर्शी’ कहाणी; १९ बालकांना जीवनदान

Solapur Mirror by Solapur Mirror
August 24, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कुशल जैन यांच्या पुढाकाराची ‘हृदयस्पर्शी’ कहाणी; १९ बालकांना जीवनदान

सोलापूर : आर्थिक परिस्थितीमुळे हृदयरोगावरील उपचार घेणे कठीण ठरणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील १९ चिमुकल्यांसाठी जिल्हा परिषदेचा संवेदनशील पुढाकार जीवनदायी ठरला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, जिल्हा शीघ्र हस्तक्षेप निदान व उपचार केंद्र (DEIC), जिल्हा रुग्णालय सोलापूर आणि मुंबईतील बालाजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून १९ बालकांवर मोफत हृदयरोग शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.

विशेष म्हणजे, केवळ उपचाराची व्यवस्था करून प्रशासन थांबले नाही, तर पालकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सीईओ कुशल जैन यांनी स्वतः पुढाकार घेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पालकांशी संवाद साधला. उपचाराची गरज, शस्त्रक्रियेची प्रक्रिया आणि त्यातून होणारे फायदे समजावून सांगत त्यांनी पालकांना धीर दिला. प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचा विश्वास दिल्यानंतर पालकांनी आपल्या चिमुकल्यांना उपचारासाठी मुंबईला पाठविण्यास संमती दिली.

११ ऑगस्ट २०२६ रोजी मोफत हृदयरोग शस्त्रक्रियेसाठी १८ बालकांना विशेष बसद्वारे मुंबईतील बालाजी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले. यापूर्वीच्या बालकासह आतापर्यंत एकूण १९ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उपचारानंतर बालकांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून सर्व बालके आपल्या पालकांसह सुखरूप घरी परतली आहेत. या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गरजू कुटुंबांवर उपचाराचा आर्थिक भार पडू नये, याची प्रशासनाने काळजी घेतली. बालकांसह पालकांचा मुंबईपर्यंतचा प्रवास, तेथील निवास, जेवण-नाश्ता, उपचार आणि शस्त्रक्रियेनंतरचा परतीचा प्रवास यासाठी पालकांना कोणताही खर्च करावा लागला नाही.

हृदयरोगावरील महागडे उपचार परवडत नसलेल्या कुटुंबांसाठी ही सुविधा मोठा आधार ठरली. चिमुकल्यांच्या उपचारासोबत त्यांच्या पालकांना मानसिक आधार देण्याचे कामही या उपक्रमातून झाले. या उपक्रमासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व DEIC केंद्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.

आरोग्य विभाग, जिल्हा रुग्णालय, DEIC केंद्र आणि बालाजी हॉस्पिटल यांच्या समन्वयातून गरजू बालकांना वेळेत उपचार मिळाल्याने १९ कुटुंबांच्या आयुष्यात आशेचा नवा किरण निर्माण झाला आहे. प्रशासकीय पुढाकाराला संवेदनशीलतेची जोड मिळाल्यास आरोग्यसेवेचा लाभ थेट गरजूंच्या घरापर्यंत पोहोचू शकतो, याचे हे ठळक उदाहरण ठरले आहे.

Previous Post

झोळांच्या अडचणी वाढल्या; अटकपूर्व जामीन फेटाळला

Next Post

शिक्षणातून प्रगतीची नवी वाट; गवंडी समाजातील गुणवंतांचा गौरव

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
शिक्षणातून प्रगतीची नवी वाट; गवंडी समाजातील गुणवंतांचा गौरव

शिक्षणातून प्रगतीची नवी वाट; गवंडी समाजातील गुणवंतांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In