Sunday, October 25, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

यंदा मानाच्या ‘आजोबा गणपती’चा उत्सव सांस्कृतिक रंगात

Solapur Mirror by Solapur Mirror
September 12, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
यंदा मानाच्या ‘आजोबा गणपती’चा उत्सव सांस्कृतिक रंगात
0
SHARES
23
VIEWS

सोलापूर ; अखंड हिंदुस्तानातील पहिले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून देशभरात ऐतिहासिक ओळख असलेल्या शुक्रवार पेठेतील श्री सदानंद समाज सार्वजनिक मानाचा आजोबा गणपती ट्रस्टच्या वतीने १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा प्रथमच सांस्कृतिक महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे.

१४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता श्रींची प्रतिष्ठापना, दुपारी ४ वाजता मान्यवरांच्या हस्ते महापूजा व आरती आणि रात्री ८ वाजता श्रीनिअंबा नृत्यालयाच्या वतीने भरतनाट्यम सादरीकरण होणार आहे. १५ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता पाच हजार महिलांच्या उपस्थितीत सामूहिक अग्निहोत्र व अथर्वशीर्ष पठण होणार असून, पुरोहित पंडित वेणुगोपाल जिल्हा पंतलु यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. यानंतर महारुद्राभिषेक, अलंकार पूजा, १०८ गणेश दूर्वा नामावली, प्रार्थना व महाआरती होणार आहे.

उत्सवकाळात दररोज महारुद्राभिषेक, अथर्वशीर्ष पठण, अलंकार पूजा, दूर्वा नामावली, प्रार्थना, महाआरती व महानैवेद्य आदी धार्मिक विधी होणार आहेत २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री आजोबा गणपतीच्या प्रतिमेचे टपाल पाकीट अनावरण होणार आहे. काशी पीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर जगद्गुरू डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या अमृतहस्ते हा सोहळा होणार असून, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस आयुक्त एम. राजकुमार व वरिष्ठ अधीक्षक टपाल हेमंत खडकीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

१५ लाखांच्या अनुदानातून प्रथमच सांस्कृतिक महोत्सव
माहाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून ट्रस्टला १५ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून यंदा प्रथमच ‘सांस्कृतिक महोत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. तसेच यामध्ये वॉटरप्रूफ मंडप, स्टेज, विद्युत रोषणाई यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. दि.२० सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. रात्री पंडित अजितकुमार कडकडे यांची संगीत रजनी होईल.

२१ सप्टेंबर रोजी रसिका कुलकर्णी व सानिका कुलकर्णी यांचा गीत रामायण, तर जितेंद्र अभ्यंकर व सप्तसूरनिर्मित ‘रंग महाराष्ट्राचे’—महाराष्ट्राची लोकपरंपरा हा कार्यक्रम होणार आहे. २२ सप्टेंबर रोजी राजस्थानी सत्संग परिवाराच्या वतीने श्री विठ्ठल जय दायमा व सहकाऱ्यांचा सुंदरकांड कार्यक्रम होईल. तसेच आजोबा गणपती ढोल पथक व वाद्यवृंदाचे सादरीकरणही होणार आहे. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता महापूजा झाल्यानंतर ११.३० वाजता पारंपरिक मार्गावरून विसर्जन मिरवणूक निघणार आहे. ही माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष काका मेंडके, सचिव अनिल सावंत, खजिनदार केदार वनारोटे, सहसचिव गंगाधर गवसने, प्रसिद्धी प्रमुख गुरुनाथ निंबाळे, राहुल कुमणे, सोमनाथ मेंडके, विशाल फुलारी आदी उपस्थित होते

Previous Post

चेनस्नॅचिंग घरफोडी ते गांजा तस्करी; गुन्हे शाखेने लावला पाच गुन्ह्यांचा छडा

Next Post

दुष्काळाचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’; जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
दुष्काळाचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’; जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर

दुष्काळाचा ‘ग्राऊंड रिपोर्ट’; जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In