Sunday, October 25, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

चार्जिंग स्टेशन, डेपोच्या कामांना वेग; दिवाळीपूर्वी ई-बस धावणार!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 13, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
चार्जिंग स्टेशन, डेपोच्या कामांना वेग; दिवाळीपूर्वी ई-बस धावणार!
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर :* शहरातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेला गती देण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने हालचाली वेगवान केल्या आहेत. दिवाळीपूर्वी शहरात ई-बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ई-बस चार्जिंग स्टेशनची उभारणी, बुधवार पेठ येथील ई-बस डेपोची अपूर्ण कामे, बसथांब्यांचे नूतनीकरण आणि तिकीट प्रणालीच्या आधुनिकीकरणावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे सोलापूरकरांना ई-बस सेवेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या स्तरावर हालचालींना वेग आला आहे.

ई-बस सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनच्या उभारणीचा मुद्दा बैठकीत केंद्रस्थानी राहिला. जेबीएम कंपनीमार्फत चार्जिंग स्टेशनचे काम तातडीने सुरू करून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याबाबत चर्चा झाली. कंपनीकडून पाच चार्जर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरातील राजेंद्र चौक आणि सात रस्ता बस डेपो येथेही चार्जिंग स्टेशन उभारण्याची शक्यता तपासण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला.

बुधवार पेठ येथील ई-बस डेपोमधील प्रलंबित सिव्हिल कामे पूर्ण करण्यासाठी महापौरांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. लेबर मक्ता निश्चित करून पुढील आठ ते दहा दिवसांत कंपाउंड वॉलचे काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. कामात अडथळे येऊ नयेत आणि ते सुरळीतपणे पूर्ण व्हावे, यासाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून घेण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.केवळ ई-बसेस रस्त्यावर आणण्यापुरते नियोजन मर्यादित न ठेवता, प्रवाशांना अधिक सोयीस्कर सेवा देण्यासाठी आवश्यक सुविधांवरही बैठकीत भर देण्यात आला. बसथांब्यांचे नूतनीकरण, आवश्यक पायाभूत सुविधांची उभारणी आणि तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण याबाबत संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्यावर चर्चा झाली.

सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ई-बस सेवा सुरू होणे महत्त्वाचे मानले जात आहे. दिवाळीपूर्वी बसेस शहरात सुरू करण्याचे नियोजन असून, त्यासाठी चार्जिंग स्टेशन आणि डेपोची कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. आता संबंधित विभाग आणि कंपनीकडून या कामांना किती गती मिळते, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, नगरसेवक गौतम कसबे, परिवहन विभागाच्या नियंत्रण अधिकारी सारिका अक्कलवार, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, नगर अभियंता नीलकंठ मठपती, अग्निशामक विभागप्रमुख राकेश साळुंखे, जेबीएम कंपनीचे प्रदीप उंबरकर, ध्रुव, परिवहन व्यवस्थापक इराण्णा वन्यालोल्लू आणि कनिष्ठ अभियंता व्यंकटेश गुडसेलू यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Tags: आमदार देवेंद्र कोठेआयुक्त डॉ. सचिन ओंबासेउपमहापौर ज्ञानेश्वरी देवकरदेवेंद्र फडणवीसनगरसेवकसभागृह नेते नरेंद्र काळेसभापती रंजिता चाकोतेसारिका अक्कलवारसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

चक्क आरोग्य केंद्रातच माव्याचा कारभार; कोणाचा वरदहस्त?

Next Post

१०५ वर्षांच्या संघर्षमय जीवनप्रवासाला पूर्णविराम; माजी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांना मातृशोक.

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
१०५ वर्षांच्या संघर्षमय जीवनप्रवासाला पूर्णविराम; माजी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांना मातृशोक.

१०५ वर्षांच्या संघर्षमय जीवनप्रवासाला पूर्णविराम; माजी आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांना मातृशोक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In