Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

८१ जंगम बटूंना मडी वस्त्र प्रदान

Solapur Mirror by Solapur Mirror
August 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
८१ जंगम बटूंना मडी वस्त्र प्रदान

सोलापूर : श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधीश्वर श्रीमद् डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी जगद्गुरू काशीपीठ यांच्या ८० व्या प्रकट दिनानिमित्त वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे ८१ जंगम बटूंना मडी वस्त्र प्रदान करण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. प्रतिष्ठानच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती शहर पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी उद्योजक सुधीरजी खरटमल, सिद्धया स्वामी हिरेमठ, केदार उंबरजे, ज्येष्ठ विधीज्ञ बसवराज सलगर, सुरेश शहापूरकर, माजी पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, डॉ. प्रकाश घटुळे, नगरसेवक रुद्रेश बोरामणी, उद्योजक अरविंद सालक्की, प्रभुराज महिंद्रकर, राचप्पा अरळीमार, आनंद पाटील हत्तुर, बॉम्बे बेकरीचे हिरेमठ, बाळासाहेब देशमुख, भीमाशंकर म्हेत्रे तसेच आचार्य पंचाक्षरी स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी जगद्गुरू चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपस्थितांना आशीर्वाद व मार्गदर्शन केले. वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या हृदयात स्थान निर्माण करत असून, या कार्याला आपला सदैव पाठिंबा व आशीर्वाद राहील, असे त्यांनी सांगितले.

पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी प्रतिष्ठानच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले. समाजातील सर्वसामान्य नागरिकांना अडचणीच्या काळात आवश्यक ती कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांतर्गत जंगम बटूंना मडी वस्त्र प्रदान करण्यात आल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

मान्यवरांचा नागरी सत्कार
कार्यक्रमादरम्यान श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्री जगदीश हिरेहब्बू, कालिका गणपती मसरे गल्ली मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ऋषिकेश पाथरीकर, व बोरामणी तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल लल्ला अवस्थी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे, सुनील शरणार्थी, कैलास जेऊरे, मंगेश स्वामी, गुरुशांत मोकाशी, शिवानंद बळोळी, सुनील रामशेट्टी, गुरु हिप्परगी, विजयकुमार तंबाके, मनोज कोले, सचिन कुलकर्णी, अजित धुम्मा, विजयकुमार स्वामी व श्रीशैल बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत अनिल वजीरकर यांनी केले, सूत्रसंचालन शशिकांत बिराजदार यांनी केले तर उपस्थितांचे आभार तम्मा कडगंची यांनी मानले.

Previous Post

रक्षाबंधन शुक्रवारीच दिवसभर साजरा करा : मोहन दाते

Next Post

नवीपेठेतील दिवेकर बेकरीमध्ये पाणीपुरीत आढळला कीडा आणि आळी

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
नवीपेठेतील दिवेकर बेकरीमध्ये पाणीपुरीत आढळला कीडा आणि आळी

नवीपेठेतील दिवेकर बेकरीमध्ये पाणीपुरीत आढळला कीडा आणि आळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In