Sunday, October 25, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

चेनस्नॅचिंग घरफोडी ते गांजा तस्करी; गुन्हे शाखेने लावला पाच गुन्ह्यांचा छडा

Solapur Mirror by Solapur Mirror
September 12, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
चेनस्नॅचिंग घरफोडी ते गांजा तस्करी; गुन्हे शाखेने लावला पाच गुन्ह्यांचा छडा
0
SHARES
34
VIEWS

सोलापूर, शहरातील घरफोडी, ज्वेलरी चोरी आणि मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत शहर गुन्हे शाखेने दोन घरफोडी, दोन ज्वेलरी चोरी आणि एक मोटारसायकल चोरी असे पाच गुन्हे उघडकीस आणले. या कारवाईत तब्बल १६ लाख ६९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याशिवाय अमली पदार्थविरोधी कारवाईत दोन किलो गांजा आणि मोटारसायकल असा १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या सूचनेनुसार पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त दिलीप पवार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी ही कारवाई केली.

गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे ग्रामीण पोलिसांच्या अभिलेखावरील आरोपी यश ऊर्फ सोन्या ज्ञानेश्वर खतले (वय २२, रा. पवननगर, गल्ली नं. २, पुणे) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या तपासात कौशल्यपूर्ण घरफोडीचे दोन गुन्हे आणि मोटारसायकल चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला. त्याच्याकडून ८१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी असा एकूण १२ लाख ८९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

दरम्यान, १ सप्टेंबर रोजी ; सुमंगलम फिर्यादी महिला अशोक चौक परिसरातून पायी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेली होती. या गुन्ह्याच्या तपासात सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संघर्ष उत्तम वाघमारे (वय २२, रा. म्हपो काठोडा, जि. बीड) याला अटक केली. त्याच्याकडून चोरीतील सोन्याची चेन तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन असा २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

तसेच ; १६ जानेवारी २०२५ रोजी ; सुमंगलम फिर्यादी महिला किरणा दुकानासमोर उभ्या असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. मात्र, आरोपी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने ते पोलिसांना गुंगारा देत होते. अखेर अजय संजय पंडित (वय २१, रा. निपाणी वडगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) आणि राहुल माणिक आमराव (वय ३०, रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांना १० सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ज्वेलरी चोरीतील ४५ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन वाट्या हस्तगत करण्यात आल्या.

तसेच; गुन्हे शाखेच्या पथकाला ; रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर जुनी मिल चाळ परिसरातील एका इसमाकडे गांजा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संशयिताला पकडून त्याच्या ताब्यातील पिशवीची तपासणी केली असता त्यात गांजासदृश पदार्थ आढळला. फॉरेन्सिक तपासणीत तो गांजा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे वजन २ किलो ११ ग्रॅम असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात शिवाजी धनू राठोड (वय ६०, रा. गणपत तांडा, दक्षिण सोलापूर) आणि त्याचा साथीदार संतोष राम चव्हाण (रा. मुळेगाव तांडा, सोलापूर) यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांजा आणि दुचाकी असा १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

Previous Post

डीजेचा आवाज वाढला की थेट ‘डायल ११२’ कॉल करा

Next Post

यंदा मानाच्या ‘आजोबा गणपती’चा उत्सव सांस्कृतिक रंगात

Related Posts

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सोलापूर जिल्हा

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..
सोलापूर जिल्हा

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!
सोलापूर जिल्हा

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!
सोलापूर जिल्हा

ब्रेकिंग : शिक्षण विभागात मोठे फेरबदल; दोन उपसंचालकांच्या बदल्या!

October 22, 2026
अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!
सोलापूर जिल्हा

अखेर पदवीधर शिक्षक-कर्मचाऱ्यांना मतदानासाठी उद्या विशेष रजा मंजूर!

October 22, 2026
उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!
सोलापूर जिल्हा

उद्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी ६५ हजार शिक्षक बजावणार मतदानाचा हक्क..!

October 22, 2026
Next Post
यंदा मानाच्या ‘आजोबा गणपती’चा उत्सव सांस्कृतिक रंगात

यंदा मानाच्या ‘आजोबा गणपती’चा उत्सव सांस्कृतिक रंगात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

१६०० बोगस शिक्षकांच्या नोंदणीचा आरोप; अमोल शिंदे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 22, 2026
भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ; २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताहाला सुरुवात ..

October 22, 2026
राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात झोळ कुटुंबीयांवर संशयाची सुई? ज्ञानदेव शिंदेच्या अटकेने तपासाला वेग!

October 22, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In