No Result
View All Result
सोलापूर, शहर प्रतिनिधी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प’ सोहळ्यांतर्गत सेटलमेंट परिसरात नागरिकांच्या आरोग्याचा जागर करण्यात आला. ‘ईच्छा भगवंताची’ नवरात्र महोत्सव मंडळ संचालित ‘ईच्छा भगवंताची’ गणेशोत्सव मंडळ आणि ‘ईच्छा भगवंताची परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडले. नागरिकांच्या आरोग्याची वेळेत तपासणी व्हावी, विविध आजारांचे प्राथमिक स्तरावरच निदान व्हावे आणि सर्वसामान्यांना तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. पौर्णिमा हिरेमठ यांनी महिलांची तपासणी करून विविध आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन केले. नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सतीश आदीमनी यांनी नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी करत नेत्रविकारांबाबत आवश्यक सूचना दिल्या. जनरल फिजिशियन डॉ. कुशल जैन यांनी सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून नागरिकांना उपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन केले.
भाजपचे नगरसेवक किसन जाधव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प’ सोहळ्यात नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत हा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्यसेवा आणि जनकल्याणाचे उपक्रम पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, नगरसेविका अंबिका गायकवाड व चैत्राली गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी नगरसेवक नागेश गायकवाड, ॲड. अनिल जाधव आणि युवा नेते चेतन गायकवाड यांच्या पुढाकारातून शिबिराचे आयोजन करण्यात आले. कैकाडी समाजाचे सचिव सुरजकुमार संभाजी गायकवाड रत्नापूरकर, मंडळाचे उत्सव अध्यक्ष उत्कर्ष विनोद गायकवाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते.
No Result
View All Result