Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

युवा महोत्सवात शास्त्रीयनृत्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध!

Solapur Mirror by Solapur Mirror
October 8, 2025
in Uncategorized
0
युवा महोत्सवात शास्त्रीयनृत्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध!
0
SHARES
8
VIEWS

सांगोला, दि.8- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 21 वा युवा महोत्सव सांगोला महाविद्यालयात मोठ्या उत्साहात सुरू असून, महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शास्त्रीय नृत्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड केले.या नृत्य स्पर्धेत विविध 10 महाविद्यालयांमधून आलेल्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक भरतनाट्यम, कत्थक आणि कुचिपुडी अशा विविध शास्त्रीय नृत्यप्रकारांनी झाली. प्रत्येक नृत्य सादरीकरणाने कलाप्रेमींना मंत्रमुग्ध केले. मंगळवेढ्यातील दलितमित्र कदम गुरुजी महाविद्यालयाच्या तृप्ती अण्णे हिने तिच्या प्रभावी नृत्य सादरीकरणातून रसिकांची वाहवा मिळवली. तिने सादर केलेल्या नृत्याने नृत्यकलेतील बारकावे आणि शिस्त यांचा सुंदर मिलाफ साधला.


सोलापूरच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील रुची रायबागकर हिने सादर केलेल्या नृत्यातील भावपूर्ण अभिव्यक्ती आणि नेमकी पदन्यास रचना लक्षणीय ठरली. त्याचबरोबर कस्तुरबा कॉलेज ऑफ एज्युकेशन, सोलापूर येथील मानसी गांधी हिने देखील अत्यंत सुरेख आणि नजाकतीने सजलेला नृत्याविष्कार सादर केला. कॉलेज ऑफ फार्मसी, दयानंद महाविद्यालय, सिंहगड कॉलेज सोलापूर आदी महाविद्यालयांमधील विद्यार्थिनींनीही अत्यंत देखण्या शैलीत शास्त्रीय नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली.


महोत्सवाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि कलाभिमुख वातावरणात झाले असून, विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून त्यांच्या कलेची समर्पितता आणि विद्यापीठ स्तरावरील नृत्यकलेच्या वाढत्या व्याप्तीचे दर्शन घडले. युवा महोत्सवाचे हे शास्त्रीय नृत्य सत्र म्हणजे परंपरेला स्पर्श करणारा आणि नव्या पिढीला प्रेरणा देणारा एक अविस्मरणीय अनुभव ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Previous Post

पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणीचा कार्यक्रम सुरु

Next Post

आता टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
आता टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी

आता टपाल घेण्यासाठीही पोस्टमन येणार घरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025