सोलापूर : घरातील स्त्री आरोग्य संपन्न असेल तर संपूर्ण कुटुंब सक्षम राहते. महिलांचे वेळेत निदान व उपचार व्हावेत यासाठी हे पिंक क्लिनिक महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी व्यक्त केले.

जिल्हा रुग्णालय सोलापूर व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘आदिशक्ती पिंक क्लिनिक’ या विशेष उपक्रमाचा लोकार्पण सोहळा सोमवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी उत्साहात पार पडला. हा उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या संकल्पनेतून आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने साकार झाला.

त्यावेळी डॉ. डोईफोडे बोलत होत्या. यावेळी मंचावर प्रांतपाल जयेश पटेल, डॉ. अग्रजा वरेरकर, डॉ. जयश्री ढवळे, अश्विनी रुरल मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, डॉ. रोहन वायचळ, पारूल पटेल, जयेश पटेल, धनश्री केळकर, नीलेश फोफलिया, संदीप जव्हेरी आदी उपस्थित होते.नांदेड, संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, जालना, बीड, परभणी आदी ११ जिल्ह्यांत स्थानिक रोटरी क्लबच्या सहकार्याने अशा प्रकारची केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

डॉ. माधवी रायते यांनी सुदृढ आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी झुबिन अमेरीया, डॉ. राजीव प्रधान, शिवाजी उपरे, सुनील माहेश्वरी, निशांत डाग, मितेश पंचमीया, संतोष कणेकर, संजय महूर, पराग कुलकर्णी, आशिष मेहता, शांता येळंबकर, जयश्री चव्हाण, लता चन्ना, स्वाती मनसावले, जान्हवी मखिजा, आसावरी सराफ, कमल जाजू, प्रांजल डागा, सरिता फोफलिया आदींची उपस्थिती होती.











