सोलापूर : पूरग्रस्त बांधवांच्या पुनर्वसनासाठी आपण सारे मिळून उभे राहू या देवपुष्प फाऊंडेशन तर्फे विद्यार्थ्यांना सेवासदन प्रशालेत वद्या वाटपचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सेवासदन संस्था सचिवा माननीय वीणा पतकी, सेवासदन प्रशालेच्या मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे, उपमुख्याध्यापिका, नंदिनी बारभाई, पर्यवेक्षिका स्वाती पोतदार . सहशिक्षक वसंत पवार, शिक्षिका स्मिता कोटकर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव व देवपुष्प फाउंडेशन संस्थापक राहुल देवानंद काटकर, देवपुष्प फाउंडेशन अध्यक्ष सागर सतीश गवळी, सल्लागार महेश वाघमारे, संचालक सुरज काटकर, अदित्य परदेशी, मयुरेश माणकेश्वर , विनोद जक्का, संतोष नरळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सेवासदन शाळेच्या शिक्षकांनी राहुल काटकर यांच्या कामाचे कौतूक केले.










