विद्यार्थ्यांसाठी सायन्स शाखेत दर्जेदार शिक्षण, CET विशेष बॅच व आधुनिक सुविधा उपलब्ध
सोलापूर : जुळे सोलापूर येथील इंडियन मॉडेल स्कूल अंतर्गत कार्यरत असलेल्या A.D. जोशी ज्युनिअर कॉलेज (IMS), सोलापूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी अकरावी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, अनुभवी शिक्षकवर्ग, आधुनिक अध्यापन पद्धती, नियमित टेस्ट सिरीज आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर यामुळे कॉलेजने अल्पावधीतच विद्यार्थ्यांमध्ये विशेष विश्वास निर्माण केला आहे.
महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या करिअरनुसार अभ्यासक्रमाची निवड करण्याची संधी दिली जात आहे. इंग्रजी, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र यांसह मराठी, हिंदी, भूगोल हे विषय उपलब्ध आहेत. तसेच कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि क्रॉप सायन्स यांसारखे बाय-फोकल विषयही विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आले आहेत.
स्पर्धा परीक्षांचा विचार करून महाविद्यालयात PCM आणि PCB – CET विशेष बॅच सुरू करण्यात आली आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेसोबतच CET तयारीवरही विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. महाविद्यालयात नियमित अध्यापनासोबत बोर्ड प्रिलिम परीक्षा, बोर्ड प्रॅक्टिकल्स, साप्ताहिक टेस्ट सिरीज आणि PCM/PCB ची विशेष तयारी करून घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अंतर्गत तसेच बाह्य पद्धतीने प्रवेश घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी लवचिक वेळापत्रक ठेवण्यात आले असून सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत ब्रिज कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. दहावीमध्ये 99 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 टक्के फी सवलत देण्यात येणार आहे. तसेच 95 ते 98.8 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 50 टक्के फी सवलत दिली जाणार आहे. 90 ते 94.8 टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना 4000 रुपयांची विशेष सवलत देण्यात येणार असल्याने गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

महाविद्यालयाने केवळ शैक्षणिक गुणवत्तेवरच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे. करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक सहली, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, फेअरवेल कार्यक्रम, एक्सकर्शन ट्रिप अशा विविध उपक्रमांचे आयोजन नियमितपणे केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना स्पर्धात्मक वातावरणात स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळत आहे.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे. अनेक विद्यार्थी प्रतिष्ठित मेडिकल कॉलेज तसेच NIT आणि IIT सारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवून कॉलेजचे नाव उज्ज्वल करत आहेत. गेल्या वर्षीच्या HSC बोर्ड परीक्षेतही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश संपादन करून सोलापूर जिल्ह्यात विशेष ठसा उमटविला होता.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासासाठी बस सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होत आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर चौकशी सुरू केली आहे. संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना केवळ गुणांपुरते शिक्षण न देता करिअर घडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगण्यात आले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत शिस्त, संस्कार आणि स्पर्धात्मक तयारी यांचा समतोल राखत विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे











