Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लाचखोरी प्रकरण गाजले; आरोपींच्या घरांची झडती, लिपिकाचा शोध सुरू

Solapur Mirror by Solapur Mirror
June 20, 2026
in सोलापूर जिल्हा
0
लाचखोरी प्रकरण गाजले; आरोपींच्या घरांची झडती, लिपिकाचा शोध सुरू
0
SHARES
130
VIEWS

सोलापूर, ; एका सहशिक्षकाची फंडाची रक्कम काढून देण्याच्या कामासाठी सहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागातील अधीक्षक व ग्रंथपालाला न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर फरार असलेल्या वरिष्ठ लिपिकाचा अॅन्टी करप्शन ब्यूरोकडून शोध सुरू आहे. या प्रकरणात वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातील अधीक्षक लक्ष्मण दत्तात्रय बालवाड (वय ५५, सध्या रा. मंगल रेसिडेन्सी, होटगी रोड, सोलापूर, मूळ रा. वायगाव, ता. अहमदपूर), वरिष्ठ लिपिक अण्णासाहेब दगडू मेटकरी (वय ४८, रा. कडलास, ता. सांगोला) तसेच श्रीमती रामबाई बाबूलाल सुराणा विद्यालय, चिकलठाण (ता. करमाळा) येथील ग्रंथपाल विक्रम हरिश्चंद्र बारबोले (वय ५५) या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अधीक्षक बालवाड आणि बारबोले यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी पैसे घेताना रंगेहाथ पकडले होते. तर लिपिक मेटकरी हा फरार झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याचा शोध सुरू केला आहे. तक्रारदाराची फंडाची रक्कम काढून देण्यासाठी आरोपींनी सहा हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर सापळा रचण्यात आला होता.

तिघांच्या घराची घेतली झडती
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अधीक्षक बालवाड याच्या सोलापुरातील भाड्याच्या घराची व लातूर येथील घराची झडती घेतली. बारबोले याच्या कुडूवाडीतील घराची तर मेटकरी याच्या सांगोल्यातील घराची झडती घेण्यात आली, परंतु घरझडतीत काही सापडले नसल्याचे सांगण्यात आले.

Previous Post

उद्या सोलापूर शहरात १६ परीक्षा केंद्रांवर साडेचार हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा

Next Post

कोल्हापूर खंडपीठाचा आदेश; आरोपी महिलेला अटकपूर्व जामीन

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
कोल्हापूर खंडपीठाचा आदेश; आरोपी महिलेला अटकपूर्व जामीन

कोल्हापूर खंडपीठाचा आदेश; आरोपी महिलेला अटकपूर्व जामीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025