Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षासाठी काम करावं : आ. सुभाष देशमुख

Solapur Mirror by Solapur Mirror
October 23, 2025
in Uncategorized
0
बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षासाठी काम करावं : आ. सुभाष देशमुख
0
SHARES
5
VIEWS

सोलापूर : जिल्ह्यातील ४ माजी आमदार लवकरच भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत परंतु या पक्षप्रवेशामुळे स्थानिक भाजपात दुफळी माजली आहे. काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला भाजपा कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले. भाजपा नेते सुभाष देशमुख यांनी या पक्षप्रवेशावर भाष्य करत बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावे त्यानंतर पक्षाने त्यांना जबाबदारी द्यावी असं विधान केले आहे. 

सुभाष देशमुख म्हणाले की, पक्षात येणाऱ्यांचे सर्वांचे स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात वाढली पाहिजे या भूमिकेचा मी आहे. परंतु हे करत असताना सर्वांनी एकमेकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. स्थानिकांची काय भूमिका आहे हे विचारून घेतले पाहिजे. जे लोक नव्याने येत आहेत त्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचे काम करावे मग पक्षाने त्यांना भूमिका द्यावी त्यात काही अडचण नाही. आज जे येत आहेत ते सर्वजण पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून येत आहेत. उद्या जर पंचायत समितीत, जिल्हा परिषदेत भाजपाच्या जास्तीत जास्त जागा आल्या त्यात मोठा गट तयार होईल. त्यात आजी-माजी आमदार सर्व एकत्र येत भाजपाचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ देतील की नाही यात शंका आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच जरी भाजपाच्या चिन्हावर लोक निवडून आले तरीही निवडणूक आयोगाने जी नियमावली तयार करून दिली आहे. त्या नियमात बसून सर्वजण गेले तर काय करणार आहोत? आज ग्रामीणचे ६ माजी आमदार आपल्याकडे असतील. त्यात उद्या जर ५० टक्क्याहून अधिक लोक बाजूला गेले तर उद्या आम्हाला धोका आहे. त्यामुळे जे कुणी येत असतील त्यांना एका अटीवर घेतले पाहिजे. या जिल्हा परिषदेत आम्हाला भागीदारी नको, आज आमचे अनेक कार्यकर्ते रात्रदिवस झटून पक्ष वाढवतायेत. माझ्याकडे असंख्य कार्यकर्ते आले त्यांनी नाराजी दाखवली. पण मी काय करणार, जो पक्षाने निर्णय घेतलाय त्याच्याशी आपल्याला सहमत राहिले पाहिजे असं मी कार्यकर्त्यांना सांगितले असंही सुभाष देशमुख म्हणाले.

दरम्यान, खासदारकीला आम्हाला झटवून घ्यायचे, आमदारकीला आम्हाला झटवून काम करून घ्यायचे आणि आमच्या निवडणुका आल्या की भागीदार आणायचे असा कार्यकर्त्यांचा संताप आहे. कार्यकर्त्यांनी कुठे जायचे ही भावना त्यांची आहे. त्यामुळे मी कुठल्याही बैठकीला जात नाही. कुठे काय चाललंय ते मला माहिती नाही. माध्यमांत जेवढी माहिती तेवढीच मला माहिती आहे. पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल त्याच्यासोबत आम्ही आहोत परंतु नेतृ्त्वानेही उद्या जिल्हा परिषदेत धोका होऊ शकतो याची दखल घेतली पाहिजे असंही सुभाष देशमुख यांनी म्हटलं. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नाने काँग्रेस-राष्ट्रवादीतील माजी आमदार भाजपात प्रवेश करत आहेत मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाने स्थानिक भाजपा नेते नाराज असल्याचे चित्र पुढे आले आहे. 

Previous Post

बिहारमध्ये तेजस्वी यादव मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार

Next Post

सलग चार दिवस सुट्टीमुळे स्वामी समर्थ मंदिर भाविकांसाठी २० तास खुले..

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
सलग चार दिवस सुट्टीमुळे स्वामी समर्थ मंदिर भाविकांसाठी २० तास खुले..

सलग चार दिवस सुट्टीमुळे स्वामी समर्थ मंदिर भाविकांसाठी २० तास खुले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025