Monday, September 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लेकीला वाचवायला आईची विहिरीत उडी; मायलेकींचा दुर्दैवी अंत

Solapur Mirror by Solapur Mirror
August 15, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
लेकीला वाचवायला आईची विहिरीत उडी; मायलेकींचा दुर्दैवी अंत

सोलापूर : करमाळा तालुक्यातील वांगी नं. १ येथील जाधव वस्तीवर शुक्रवारी दुपारी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. खेळताना दोन वर्षांची चिमुकली विहिरीत पडली. तिला वाचवण्यासाठी आईनेही विहिरीत उडी घेतली; मात्र पोहता येत नसल्याने मायलेकींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शिल्पा सागर जाधव (वय २८) आणि ऋता सागर जाधव (वय २) अशी मृत मायलेकींची नावे आहेत.

वांगी नं. १ येथील लोकविकास डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील जाधव वस्तीवर ही घटना घडली. शिल्पा यांचे पती सागर जाधव यांचे मोबाईलचे दुकान असून, शुक्रवारी सकाळी ते औषधे आणण्यासाठी टेंभुर्णी येथे गेले होते. त्यावेळी शिल्पा यांच्या सासू शेतात कामासाठी गेल्या होत्या, तर सासरे खंडेराव जाधव हे पक्षाघाताने आजारी असल्याने घरीच होते. दुपारी दीडच्या सुमारास घरातील इतर सदस्य जेवणासाठी घरी आले. त्यावेळी शिल्पा आणि ऋता घरात दिसून न आल्याने कुटुंबीयांनी परिसरात त्यांचा शोध सुरू केला. शोध घेत असताना घराजवळील विहिरीत ऋताची चप्पल तरंगताना दिसली. त्यामुळे कुटुंबीयांसह गावातील युवकांनी तातडीने विहिरीत शोधमोहीम सुरू केली.

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तीन विद्युत मोटारींच्या साहाय्याने पाणी उपसण्यात आले. त्यानंतर काही युवकांनी विहिरीत उतरून शोध घेतला असता प्रथम चिमुकली ऋताचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पुन्हा शोध घेतल्यानंतर काही वेळाने शिल्पा यांचाही मृतदेह सापडला.प्राथमिक माहितीनुसार, ऋता खेळत असताना घराजवळील विहिरीत पडली असावी. चिमुकलीला वाचवण्यासाठी आई शिल्पा यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने दोघीही पाण्यात बुडाल्याचे सांगण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरील कार्यवाही पूर्ण केल्यानंतर मायलेकींचे मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत याबाबतची कार्यवाही सुरू होती. दोन वर्षांच्या चिमुकलीला वाचविण्याच्या प्रयत्नात आईनेही जीव गमावल्याने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या हृदयद्रावक घटनेने वांगी नं. १ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post

जिल्हा परिषदेत ; अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या हस्ते ध्वजारोहण संप्पन

Next Post

ई-बसेसचा श्रीगणेशा; सोलापूरची सार्वजनिक वाहतूक होणार ‘स्मार्ट’

Related Posts

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले
सोलापूर जिल्हा

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..
सोलापूर जिल्हा

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट
सोलापूर जिल्हा

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार
सोलापूर जिल्हा

बाप्पांच्या मिरवणुकीसाठी पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ ; पोलीस आयुक्त एम. राजकुमार

September 2, 2026
शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश
सोलापूर जिल्हा

शालार्थ घोटाळ्याचा ‘हिशेब’ आता डिसेंबरअखेर! ; उपसचिवांनी काढला आदेश

September 2, 2026
विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा
सोलापूर जिल्हा

विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात ‘क्रीडा’ विषयाचा समावेश व्हावा

September 2, 2026
Next Post
ई-बसेसचा श्रीगणेशा; सोलापूरची सार्वजनिक वाहतूक होणार ‘स्मार्ट’

ई-बसेसचा श्रीगणेशा; सोलापूरची सार्वजनिक वाहतूक होणार ‘स्मार्ट’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

पिके करपली, पाणी आटले; सुभाष देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना घेरले

September 2, 2026
रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

रुग्णालय मोठे पण नियोजन खोटे ; अधिष्ठाताही फोन उचलेना. रुग्णांचा जीव टांगणीला..

September 2, 2026
३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

३० खेळाडूंना ‘ऑपरेशन पहाट’ची अनोखी भेट

September 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In